Aurangabad Z.P. Reservation News Sarkarnama
मराठवाडा

Aurangabad : अध्यक्ष, उपाध्यक्षांचे गट राखीव, अनेक दिग्गजांनाही धक्का..

शिक्षण समिती सभापती अविनाश गलांडे यांचा गट महिला राखीव झाला असून माजी मंत्री संदीपान भुमरे यांचे चिरंजीव व माजी बांधकाम सभापती विलास भुमरे यांचा गट सर्वसाधारण महिलेसाठी राखीव. (Aurangabad)

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : कोरोना आणि ओबीसी राजकी आरक्षण अशा विविध कारणांनी लांबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या निवडणुकीच्या कार्यक्रमाला आता वेग आला आहे. जिल्हा परिषदांसाठी आज काढण्यात आलेल्या आरक्षणात (Aurangabad) औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष व उपाध्यक्षांसह अनेक दिग्गजांचे गट आरक्षित झाले आहेत. त्यामुळे आता नव्या गटांसाठी त्यांना धावपळ करावी लागणार आहे.

औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या (Zillha Parisad) ७० गटासाठी आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा मीना शेळके यांचा गट ओबीसी पुरुष राखीव, तर उपाध्यक्ष एल.जी. गायकवाड यांचा गट सर्वसाधारण महिला राखीव झाला आहे. (Reservation) तसेच शिक्षण समिती सभापती अविनाश गलांडे यांचा गट महिला राखीव झाला असून माजी मंत्री संदीपान भुमरे यांचे चिरंजीव व माजी बांधकाम सभापती विलास भुमरे यांचा गट सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाल्याने त्यांना आता दुसऱ्या गटातून निवडणुक लढवावी लागणार आहे.

जिल्हा परिषदाच्या एकूण ७० गटांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले. यात ओबीसीसाठी १८, पैकी ९ महिलांसाठी राखीव म्हणजेच ५० टक्के जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. अनुसूचित जातीसाठीच्या ९ पैकी ५ महिलांसाठी राखीव, अनुसूचित जमाती ४ जागा पैकी २ महिलांसाठी तर खुल्या प्रवर्गासाठी ३९ गट यातून १९ महिला राखीव असणार आहे.

महिलांसाठी आरक्षीत असलेल्या गटांमध्ये अनुसूचित जातीच्या महिलांसाठी जेहूर, बालानगर, गदाना, गोंदेगाव, बाबरा तर अनुसुचित जमातीच्या महिलांसाठी कुंजखेडा,संवदगाव गट राखीव आहेत. तसेच ओबीसी महिलांसाठी डोंगरगाव, डावलवाडी, भराडी, अंधारी, पळशी, भवन, हतनूर, वाकला शिवूर

तर सर्वसाधारण महिलांसाठी शिवना, नागद, चिंचोली लिंबाजी, पाल, बाजारसावंगी, लाडगाव, चोरवाघलगाव, महालगाव, अनंतपुर(सावंगी), शेंदुरवाद, लाडसावंगी, गोलटगाव, वडगाव कोल्हाटी, पंढरपुर, आडगाव. बु.,पिंप्री, पाचोड, पिंपळवाडी पिराची हे गट राखीव असणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT