Minister Abdul Sattar-Ambadas Danve News Sarkarnama
मराठवाडा

Aurangabad : टीईटी घोटाळ्यात सत्तारांना घेरण्यासाठी शिवसेना अवाज उठवणार..

सत्तार यांनी टीईटी घोटाळ्यात त्यांच्या मुलांची नाव आल्यानंतर शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांवर दबाव आणून कागदपत्रं बदलली. (Opposition Leader Ambadas Danve)

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराच्या वेळी अचानक समोर आलेल्या राज्यातील टीईटी घोटाळ्यात मंत्रीपदाच्या शर्यतीत असलेल्या (Abdul Sattar)अब्दुल सत्तार यांचे नाव आले. पण या संकटावर मात करत सत्तारांनी मंत्रीपद मिळवलेच. एवढेच नाही तर त्यांना कृषी सारख्या महत्वाच्या खात्याची जबाबदारी मिळाली. त्यामुळे (Shivsena) शिवसेनेकडून आता पुन्हा टीईटी घोटाळा आणि त्यात सत्तारांच्या मुलांची आलेली नावे यावरून रान उठवण्याच्या तयारीत आहे.

शिवसेनेचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अब्दुल सत्तार यांची टीईटी घोटाळा प्रकरणात चौकशी करावी, अशी मागणी करतांनाच शिवसेना या प्रश्नावर अवाज उठवणार असल्याचे म्हटले आहे. (TET Exam Scam) विधीमंडळ अधिवेशनात टीईटी घोटाळा गाजेल, विरोधक अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती, पण तसे काहीच घडले नाही.

विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हा विषय लावून धरला, पण सत्ताधाऱ्यांनी त्याला फारसे गांभीर्याने घेतले नाही. त्यानंतर आता सभागृहाबाहेर रस्त्यावर उतरून अब्दुल सत्तार व त्यांच्या कुटुंबियांचा टीईटी घोटाळ्यातील समावेश यावरून आंदोलन छेडण्याचा इशारा दानवे यांनी दिला आहे.

प्रसार माध्यमांशी बोलतांना अंबादास दानवे म्हणाले, अब्दुल सत्तार यांनी टीईटी घोटाळ्यात त्यांच्या मुलांची नाव आल्यानंतर शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांवर दबाव आणून कागदपत्रं बदलली. माझ्या मुलींनी पगार उचलला नाही असा सत्तारांनी केलेला दावा देखील खोटा होता. सत्तार यांच्या मुलींसह त्यांच्या संस्थेतील एकूण बारा लोकांनी टीईटीच्या बोगस प्रमाणपत्रावर नोकरी आणि पगार उचलल्याचे कागदोपत्री पुरावे माझ्याकडे आहेत.

विधान परिषदेत मी हा विषय उचलला पण सत्ताधाऱ्यांनी त्यावर समाधानकारक उत्तर दिले नाही. शिंदे-फडणीवस सरकार मंत्री अब्दुल सत्तार यांना पाठीशी घालत आहे. त्यामुळे टीईटी घोटाळ्यात अब्दुल सत्तार यांची चौकशी करावी, या मागणीसाठी आता शिवसेना आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही दानवे यांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT