Abdul Sattar-Mp Supriya Sule News, Aurangabad
Abdul Sattar-Mp Supriya Sule News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Aurangabad : सुप्रिया सुळे यांच्यावरील टीकेनंतर तीन दिवसांनी सत्तारांवर फुलांची उधळण..

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर गलिच्छ भाषेत टीका केल्यानंतर तीन दिवसांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार आज औरंगाबादेत आले होते. शासकीय विश्रामगृहात त्यांच्यावर अक्षरशः फुलांची उधळण करण्यात आली. समर्थकांच्या या उत्साहाने सत्तार चांगलेच भारावले असले तरी विरोधकांकडून मात्र या कृतीवर सडकून टीका होवू लागली आहे.

सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर सिल्लोड येथे ७ नोव्हेंबर रोजी सत्तार यांनी असभ्य भाषा वापरत टीका केली होती. त्यानंतर राज्यभरात याचे पडसाद उमटून सत्तार (Abdul Sattar) यांच्या विरोधात मोठे आंदोलन राष्ट्रवादीच्या वतीने उभारण्यात आले होते. मुंबईतील सत्तारांच्या शासकीय निवासस्थानसह औरंगाबादेतील घरावर राष्ट्रवीदीच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक करत तीव्र आंदोलन छेडले होते.

सत्तारांच्या राजीनाम्यासाठी महिला कार्यकर्त्या देखील रस्त्यावर उतरल्या होत्या. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी देखील सत्तारांच्या या विधानाची दखल घेत त्यांना खडसावले होते. सुळे यांच्याबद्दल वापरेली भाषा अंगलट आल्यानंतर सत्तारांनी दिलगिरी व्यक्त करत प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. पण त्यानंतरही राष्ट्रवादी आक्रमकच होती, अगदी राज्यपालांना निवेदन देत सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती.

मुख्यमंत्र्यांनी देखील पुढील काही दिवस जाहीर कार्यक्रमात सहभागी होवू नका, अशा सूचना दिल्यामुळे सत्तारांनी नियोजित बुलडाणा दौरा रद्द केल्याची चर्चा होती. त्यानंतर तीन दिवसांनी आज पीक विमा आढावा बैठकीसाठी सत्तार हे विभागीय आयुक्त कार्यालयात आले होते. तत्पुर्वी सुभेदारी विश्राम गृहात त्यांच्यावर समर्थकांनी फुलांचा वर्षावर करत त्यांचे स्वागत केले. ऐरवी माध्यामांच्या कॅमेऱ्यासमोर भरभरून बोलणारे सत्तार आज मात्र सावध भूमिका घेतांना दिसले.

राष्ट्रवादीकडून होणाऱ्या राजीनाम्याच्या मागणी बद्दल विचारले असता, `मी सुरक्षित आहे`, एवढेच सांगत त्यांनी माध्यमांना टाळले. अब्दुल सत्तार यांचे पडद्यामागील राजकीय मित्र केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर झालेल्या टीकेनंतर `माझा मित्र सुरक्षित आहे का`? अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर आज सत्तार यांनी मी सुरक्षित आहे, असे म्हणत आपले आणि दानवेंचे सुरू किती जुळतात हे पुन्हा एकदा दाखवून दिल्याची चर्चा होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT