Aurangabad to Sambhajinagar Politics
Aurangabad to Sambhajinagar Politics Sarkarnama
मराठवाडा

Aurangabad to Sambhajinagar Politics : औरंगाबाद ते छत्रपती संभाजीनगर; 34 वर्षांचा इतिहास आणि राजकारण

सरकारनामा ब्युरो

Aurangabad-Sambhajinagar Politics : औरंगाबादकरांसाठी केंद्र सरकारने एक गुड न्युज दिली आहे. चौतीस वर्षांच्या प्रतिक्षेनंतर केंद्र सरकारने औरंगाबादचे नामकरण ‘छत्रपती संभाजीनगर’ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

गेल्या ३४ वर्षांपासून औरंगाबाद'चे नामांतर संभाजीनगर असे करावे यासाठी राज्यात मोठे राजकारण झाले. याच मुद्द्याभोवती औरंगाबाद महापालिका, विधानसभा, लोकसभा निवडणुका लढविल्या गेल्या. आता केंद्र सरकारने नामांतरासाठी मंजूरी दिल्यानंतर श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे.

असा आहे, गेल्या ३४ वर्षांचा इतिहास...

१९८८ मध्ये औरंगाबाद महापालिकेत ऐतिहासिक विजय मिळविल्यानंतर मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावरील सभेत पहिल्यांदा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ‘संभाजीनगर’चा नारा दिला होता. तेव्हापासून शिवसेनेसह भाजप, मनसे देखील औरंगाबादचा ‘संभाजीनगर’ असा उल्लेख करते. १९८८ पासून औरंगाबाद महापालिकेची निवडणूक ‘संभाजीनगर’ या नावाभोवतीच फिरत आहे.

राज्यात १९९५ मध्ये पहिल्यांदा शिवसेना-भाजप युतीचे सरकार स्थापन झाले. त्यावेळीच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादचे नामांतर ‘संभाजीनगर’ असे करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे हे त्यावेळी औरंगाबादचे आणि माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे जालना जिल्ह्याचे पालकमंत्री होते. मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांनी नामांतराचा प्रस्ताव मांडला आणि त्याला मंजुरीही देण्यात आली.

त्यानंतर १९ जून १९९५ रोजी औरंगाबाद महापालिकेने हा ठराव मंजूर केला. त्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्येही नामांतराचा प्रस्ताव मांडून ते मंजूर करण्यात आले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारच्या शेवटच्या कॅबिनेट बैठकीत ‘संभाजीनगर’ आणि ‘धाराशीव’चा ठराव घेतला. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने पुन्हा ‘छत्रपती संभाजीनगर’ नामकरणाचा ठराव घेऊन केंद्र सरकारकडे पाठविले होता. त्याच प्रस्तावाला आता केंद्राने मंजुरी दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT