Mla Sanjay Shirsat-Collector Pandey News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Aurangabad : सुर जुळले, शिरसाटांनी जिल्हाधिकाऱ्यांची घरी जाऊन घेतली सदिच्छा भेट..

आमदार संजय शिरसाट आणि आस्तीककुमार पांडेय यांच्यात शहरातील सायकल ट्रॅकच्या मुद्यावरून वाद झाले होते. (Mla Sanjay Shirsat)

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : महापालिका आयुक्त आणि प्रशासक असतांना ज्या आस्तीककुमार पांडेय यांच्याशी आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांचा छत्तीसचा आकडा होता, तेच पांडेय आता जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले आहेत. (Aurangabad) औरंगाबादला नियुक्ती मिळावी यासाठी पांडेय यांना बरीच अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागली अशी देखील चर्चा आहे. त्यापैकीच एक अडथळा आमदार संजय शिरसाट यांचा देखील होता, असे बोलले जाते.

शिरसाट यांचा विरोध मोडून काढत अखेर पांडेय जिल्हाधिकारी (Collector) म्हणून रुजू झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिरसाट आणि पांडेय यांच्यात समेट घडवून आणल्याची देखील चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर शिरसाट यांनी जिल्हाधिकारी पांडेय यांच्या घरी जावून त्यांची भेट घेतली. त्यामुळे या दोघांमधील वाद मिटून सुर जुळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

आमदार संजय शिरसाट आणि आस्तीककुमार पांडेय यांच्यात शहरातील सायकल ट्रॅकच्या मुद्यावरून वाद झाले होते. पांडेय यांचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या ड्रीम पोजेक्ट पैकी एक असलेल्या सायकल ट्रॅकसाठी पांडेय यांनी पुढाकार घेतला होता.

संजय शिरसाट यांच्या पश्चिम मतदार संघात येणाऱ्या क्रांतीचौक ते रेल्वेस्टेशन मार्गावर हा सायकल ट्रॅक उभारण्यात आला आहे. विशेष म्हणजे तेव्हा शिरसाट यांना विचारत न घेता पांडेय यांनी या सायकल ट्रॅकचे काम पुढे रेटल्यामुळेच या दोघांमध्ये वादाचा थिनगी पडली होती. रेल्वेस्टेशनकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर सायकल ट्रॅक उभारला तर वाहतूक कोंडी होईल, अशी भूमिका शिरसाट यांनी घेतली होती.

शिवाय व्यापाऱ्यांचा देखील याला विरोध असल्याचा दावा केला होता. मात्र यानंतरही पांडेय यांनी हा सायकल ट्रॅक पुर्ण केलाच. या शिवाय आमदार निधीतून केल्या जाणाऱ्या कामांच्या शिरसाट यांच्या फायली देखील पांडेय यांनी रोखून ठेवल्या होत्या, अशी त्यावेळी चर्चा होती. एकूणच शिरसाट आणि पांडेय यांचे संबंध कमाली ताणले गेले होते.

त्यामुळे औरंगाबादेत जिल्हाधिकारी म्हणून येतांना पांडेय यांच्या मार्गात शिरसाट यांचा मोठा अडथळा होता. शिवाय ते मुख्यमंत्र्यांच्या विश्वासातले असल्यामुळे त्यांचा विरोध असेल तर नियुक्ती होणे कठीण जाणार होते. पण पांडेय यांनी यातून मार्ग काढत अखेर नियुक्तीवर शिक्कामोर्तब मिळवलेच.

शिरसाटांची नाराजी दूर करण्यात पांडेय यशस्वी झाल्यामुळेच हे शक्य झाल्याची देखील चर्चा आहे. शिरसाटांच्या मार्गात अडथळा न आणण्याच्या अटीवरच पांडेय यांना औरंगाबादला नियुक्ती दिली गेल्याचे बोलले जाते. पांडेय यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शिरसाटांनी घरी जावून त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केल्यामुळे आता वाद मिटल्याचे चित्र सद्या तरी दिसत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT