MNS Leader Raj Thackeray
MNS Leader Raj Thackeray Sarkarnama
मराठवाडा

Aurangabad : दोन हजार पोलिस, अन् ८ उपायुक्त ; `राजसभे`साठी तगडा बंदोबस्त..

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची १ मे रोजी मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर जाहीर सभा होणार आहे. (MNS) या सभेला पोलिसांकडून परवानगी दिली जाणार असल्याचे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी काल मुंबईत पत्रकारांशी बोलतांना स्पष्ट केले होते. (Raj Thackeray) त्यामुळे आता परवानगीची औपचारिकता तेवढी शिल्लक आहे. पोलिसांकडून अधिकृत परवानगीची घोषणा सांयकाळपर्यंत केली जाऊ शकते.

परवानगी मिळाली नाही तर सभा घेण्यावर मनसे ठाम असल्याने पोलिसांनी देखील संघर्ष टाळत संयमाची भूमिका घेतली आहे. (Aurangabad) काल मनसे नेत्यांच्या आघी स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांना मराठावाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानाची जाऊन पाहणी केली होती. त्यानंतर सायंकाळी (Police Commissioner) पोलिस आयुक्त डाॅ. निखिल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकाऱ्यांची महत्वाची बैठक देखील पार पडली.

राज ठाकरे यांची सभा १ मे म्हणजेच महाराष्ट्र दिनी होत आहे. ३ मे रोजी रमझान सण असल्याने राजसभेतून कुठल्याही प्रकारचे वादग्रस्त वक्तव्य केले जाऊ नये, याकडे पोलिसांनी लक्ष्य केंद्रित केले आहे. सभेला परवानगीच काही कडक अटी-शर्ती घालूनच देण्यात येणार आहे. असे असले तरी कुठलाही अनुचित प्रकार सभे दरम्यान, किंवा त्यानंतर घडू नये, यासाठी पोलिसांनी देखील कंबर कसली आहे.

या सभेच्या बंदोबस्तासाठी तब्बल ८ डीसीपींसह अन्य अधिकारी व दोन हजार पोलिस असा प्रचंड फौजफाटा तैनात करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. औरंगाबाद हे संवेदनशील शहर म्हणून ओळखले जाते. राज्य व देश पातळीवरील घटना घडामोडींचे पडसाद इथे ताबडतोब उमटते.

त्यातच राज ठाकरे हे मशिदीवरील भोंग्याविषयी सभेत बोलणार आहेत, त्यामुळे पोलिस अधिक सतर्क झाले आहेत. राज ठाकरे यांची सभा शांततेत पार पडावी, यासाठी पोलिसांकडून मनसेच्या नेते, पदाधिकाऱ्यांना देखील आवाहन करण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT