Aurangabad West Assembly Constituency jogendra kawade election campaign for sanjay shirsat 
मराठवाडा

Aurangabad West Assembly Constituency : संजय शिरसाट यांना जनेतचे दुःख समजते, तोच खरा नेता : जोगेंद्र कवाडे

महायुतीचे पश्चिम विधानसभा मतदार संघाचे उमेदवार संजय शिरसाट यांच्या प्रचारार्थ रीपबलिकन पार्टीचे नेते प्रा. जोगेंद्र कवाडे यांची कबीरनगर- उस्मानपुरा या भागात जाहिर सभा पार पडली

सरकारनामा ब्यूरो

छ्त्रपती संभाजीनगर : महायुतीचे पश्चिम विधानसभा मतदार संघाचे उमेदवार संजय शिरसाट यांच्या प्रचारार्थ रीपबलिकन पार्टीचे नेते प्रा. जोगेंद्र कवाडे यांची कबीरनगर- उस्मानपुरा या भागात जाहिर सभा पार पडली तसेच प्रा. कवाडे याच्याकडून उमेदवार संजय शिरसाट यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.

याप्रसंगी उमेदवार संजय शिरसाट, जिल्हाप्रमूख राजेंद्र जंजाळ, रिब्लीकन पार्टीचे कार्याध्यक्ष बाबुराव कदम, बालाजी सूर्य वंशी, किशोर थोरात, नागराज गायकवाड, महेंद्र सोंदवे, राजु जाधव, शेषराव सातपुते, विजय पैठणे, बालाजी किशोर थोरात, नागराज गायकवाड, संजय ठोकळ, राहुल सोनवणे, विजय टाक, नागेश राउत,

अशोक वाहून, अनील गायकवाड, किशोर बोर्ड, अमोल दाभाडे यांची प्रमूख उपस्थिती होती. महायुतीचे उमेदवार संजय शिरसाट यांनी पश्चिम विधानसभा मतदार अनेक विकास कामे केली आहे, आम्हाला आमदार निधीचे १० लाख माहिती होते, परंतु या आमदाराने या कबीर नगर उस्मानपुरा या भागात ५ कोटींचे बुद्धविहार दिले या बुध्दविहार मध्ये वचन कक्ष, मेडीटेशन सेंटर असे विविध गोष्टी होणार आहेत,

त्यामुळें असा विकास कामे करणारा आमदार आपल्या पुन्हा एकदा निवडून द्यायचा आहे असे, आवाहन बाबूराव कदम यांनी केले. आमदार संजय शिरसाट म्हणाले की, या भागामध्ये याधी कोणी लक्ष देत नव्हते कुठं लेहि विकास काम होत नव्हती १५ वर्षात माझ्या माध्यमातुन अनेक रस्ते, ड्रेणेज लाईन, सभागृह असे विवीध विकास कामे झाली आहेत,

समाजाचं काम करायचे असेल तर काम करून दाखवा, त्यांना खोटे आश्र्वासन देवून समाजला धोका देउ नका, संजय शिरसाट जे बोलतो तेच कामे करतो जातं पात माझ्याकडे नाही कारण मला सर्व समाजाचे लोक आशिर्वाद देतात.

नगरसेवक असताना या भागात विकास कामे मी केली आहे, मी खंडणी खोर नाही, लोकांचं कामे करतो त्यामुळे अभिमान जगतो, काही लोक विकास कामे सुरू असताना राजकारण करतात, लोकांचं विकासच राजकरण करा, पश्चिम विधानसभा मतदार संघात कुठं ही जा मी विकास कामे केली आहे,

त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत तुमची एकता दाखवा विकासासाठी एक व्हाव, तुमची ताकद मला पुढे घेऊन जाणार आहे. त्यामुळे मतदान करून निवडून द्या असे आवाहन संजय शिरसाट यांनी केले. रीपबलिक पार्टीचे जोगेंद्र कवाडे म्हणाले की, विकासपुरुष संजय शिरसाट यांना स्वाभिमानाची भावना आपणं सर्वांनी मोठ्या मताधिक्याने विजयी करा आणि विरोधकांचे तोंड काळे करा. कोरोनाच्या काळात उद्धव ठाकरे यांनी घरात बसून काम केले,

त्यामुळें कोरोनाच्या काळात महविकास आघडीने काहींच केले नाही, लोकांच्या मनात राहिलं अस काम विरोधकांनी केले नाही ते संजय शिरसाट यांनी केले. जनतेने मध्ये राहतो तोच खरा कॉमन मॅन आहे, आणि तो माणूस म्हणजेच एकनाथ शिंदे आहे. पश्चिम विधानसभा मतदार संघात जीवाच रान करणारे संजय शिरसाट आहे,

ज्याला लोकांचं दुःख समजते तोच खरा नेता. त्यामुळेच जनतेने त्यांना तीन वेळा आमदार केले, यावेळी पण त्यांना जनता निवडून दिल्या शिवाय राहणार नाही असा विश्वास मला आहे. यावेळी त्यांना आमदार करण्याबरोबरच मंत्री करायचे आहे. यामुळे या भागाचा विकास अजुन झपाट्याने होईल. या ठिकाणी सगळी गरीब वस्ती आहे त्याकडे फक्त संजय शिरसाट हाच माणूस लक्ष देऊ शकतो त्यांना गरीबाची जान आहे.

संजय शिरसाट यांच्या सारखा आपल नेता आहे त्यांना येणाऱ्या वीस तारखेला मतदान करून इतिहास घडवा आणि धनुष्यबाण समोरील बटन दाबून वियजी करा,असे आवाहन जोगेंद्र कवाडे यांनी केले. यावेळी अशोक वाहूळ, उपशहरप्रमुख, विजय टाक, विभागप्रमुख नितीन साळवे, शाखाप्रमुख अशोक तुसांबड, उपविभाग प्रमुख अविनाश काळे,

उपविभाग प्रमुख आकाश त्रिभुवन, उपशाखाप्रमुख सुनील शिरसवाल, उपविभाग प्रमुख संदीप चाबुकस्वार, गटप्रमुख बुद्धभूषण शिंगारे, गटप्रमुख गणेश ननवरे, गटप्रमुख सुनील पोहाल, गटप्रमुख मनोज म्हस्के, गटप्रमुख किरण दिवेकर, उपशाखाप्रमुख योगेश प्रधान, उपविभाग प्रमुख नवल सूर्यवंशी, अनिल गायकवाड, किशोर बोर्डे, रमेश मधने, किशोर खाजेकर, अमोल दाभाडे, रुक्मिणीबाई दाभाडे आदिंची उपस्थिती होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT