Mla Sanipan Bhumre, News Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Aurangabad : तू मला शहाणपणा नको शिकवू, जाब विचारणाऱ्या शिवसैनिकावर भुमरे भडकले..

आता ते सगळीकडे जाणारच आहेत, तु कशाला मला विचारतो. आपणही रॅली काढणार आहे, तेव्हा पहाय किती गर्दी होते. (Mla Sandipan Bhumre)

सरकरनामा ब्युरो

औरंगाबाद : ` अजून तुम्हाला काय हवे होते`, असा सवाल करत युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी काल संदीपान भुमरे यांच्या मतदारसंघात जोरदार रॅली काढली. शिवसवांद मोहिमे अंतर्गत त्यांनी (Paithan) पैठण व जिल्ह्यासाठी दिलेल्या निधीची यादीच वाचून दाखवली. शिवसैनिक आणि सामान्य लोकांचा आदित्य ठाकरे यांना जोरदार पाठिंबा मिळाला. त्यानंतर एका (Shivsena) शिवसैनिकाने संदीपान भुमरे यांना फोन करून तुमच्या मतदारसंघात निघालेली रॅली आणि त्याला मिळालेला प्रतिसाद पाहिला का? तुम्ही असे का केले? असा जाब विचारला.

त्यावर भडकलेल्या भुमरेंनी त्याला तू मला शहाणपणा नको शिकवू, मी रॅली काढेन तेव्हा किती गर्दी होती ते पहाय, अशा शब्दात संताप व्यक्त केला. हा आॅडिओ काॅल सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याची एकच चर्चा सुरू आहे. (Aurangabad) एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी दोन दिवस दौरा करत बंडखोरांच्या मतदारसंघात जोरदार शक्तीप्रदर्शन केले. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर, पैठण, गंगापूर, औरंगाबाद पश्चिम या मतदारसंघात देखील ठाकरे यांना जोरदार प्रतिसाद मिळाला.

काल बिडकीन येथे काढलेल्या रॅलीत हजारोंच्या संख्येने शिवसैनिक जमले होते. यावेळी केलेल्या भाषणात आदित्य ठाकरे यांनी भुमरे यांचा चांगलाच समाचार घेतला. त्यानंतर संध्याकाळी औरंगाबादेतील एका शिवसैनिकाने भुमरे यांना फोन करून तुमच्या मतदारसंघात, तुम्हाला मतदान केलेले लोक काल आदित्य ठाकरे यांच्या रॅलीत होते. तुम्ही असे का केले म्हणत जाब विचारला.

यावर भुमरे चांगलेच भडकले, आता ते सगळीकडे जाणारच आहेत, तु कशाला मला विचारतो. आपणही रॅली काढणार आहे, तेव्हा पहाय किती गर्दी होते. तु मला येऊन भेट तुला सांगतो मी कशासाठी केले? काय झाले होते? यावर मी एक शिवसैनिक आहे म्हणून तुम्हाल विचारतो. आदित्य ठाकरेंना तुमच्या मतदारसंघात मिळालेला प्रतिसाद एकदा पहा, मी येतो मला वेळ द्या, असेही हा शिवसैनिक म्हणाला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT