BJP MLA Abhimanyu Pawar carries the first sugar bag from the revived Killari sugar factory and offers it to Nilkantheshwar after a 3-km prostration vow. Sarkarnama
मराठवाडा

Abhimanyu Pawar : देवाभाऊच्या आमदाराने शब्द पाळला; साखरेचे पहिले पोते 3 किलोमीटर दंडवत घालत निळकंठेश्वराच्या चरणी

Killari Sugar Factory : भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी किल्लारी साखर कारखाना पुनरुज्जीवित करत वचनपूर्ती केली. पहिले साखर पोते 3 किमी दंडवत घालत निळकंठेश्वर मंदिरात अर्पण करून नवस पूर्ण केला.

Jagdish Pansare

Sugar Factory News : औसा मतदारसंघाचे भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी विधानसभा निवडणुकीपुर्वी बंद पडलेला किल्लारी साखर कारखाना सुरू करण्याचा शब्द दिला होता. वर्षभरातच हा शब्द पूर्ण करत देवाभाऊंच्या या आमदाराने कारखान्यातून निघालेले पहिले साखरेचे पोते दंडवत घालत निळकंठेश्वराच्या चरणी अर्पण केले. किल्लारी कारखाना गेल्या अनेक वर्षांपासून बंद होता. तो सुरू करण्यासाठी अभिमन्यू पवार यांनी प्रयत्न केले आणि आता प्रत्यक्षात कारखान्याचे बाॅयरल पेटले आहे.

अनेक वर्षांपासून बंद असलेला किल्लारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी यातील मशिनरी बदलून क्षमतावाढीचे काम वेगाने पूर्ण केले. 2o हजारांहून अधिक टन ऊस गाळप झाल्यानंतर आमदार पवार यांनी शनिवारी (ता. 6) पहाटे 3 किलोमीटर साष्टांग दंडवत घालत निळकंठेश्वर मंदिरात साखरेचे पहिले पोते अर्पण करत नवसपूर्ती केली. किल्लारी येथील शेतकरी सहकारी साखर कारखाना पुनरुज्जीवन करण्याचा शब्द पवार यांनी शेतकऱ्यांना होता.

त्यानुसार 2025 च्या पहिल्या तिमाहीत मशिनरी बदलण्याचे आणि कारखान्याच्या आधुनिकीकरणाचे मोठे काम सुरू झाले, पण प्रगती संथ होती. परिस्थिती अशी होती की फेब्रुवारी 2026 पूर्वी गाळप सुरू होणे कठीणच होते. या अडचणीच्या काळात आमदार पवारांनी श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी निळकंठेश्वर मंदिर गाठत कारखाना वेळेवर सुरू होऊ दे, कारखान्यातून बाहेर पडणारे पहिले साखरेचे पोते घेऊन कारखान्यापासून मंदिरापर्यंत दंडवत घालत दर्शनाला येईन, असा नवस केला होता.

श्री.नीळकंठेश्वराला बोललेला नवस फळाला आला. सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे क्षमतावाढीची कामे वेगाने पूर्ण झाले. मग कारखान्यालाही श्री निळकंठेश्वर शेतकरी सहकार साखर कारखाना, असे नाव देण्याचा निर्णयही घेण्यात आला. कारखाना वेळेवर सुरू झाला. सध्या 20 हजार मेट्रिक टनांहून अधिक ऊस गाळप पूर्ण झाले आहे. नवस फेडीसाठी आमदार अभिमन्यू पवार यांनी कारखाना ते निळकंठेश्वर मंदिर असे तीन किलोमीटरचे अंतर साष्टांग दंडवत घालत गाठले.

कारखान्यातून बाहेर पडलेले साखरेचे पहिले पोते त्यांनी निळकंठेश्वराच्या चरणी अर्पण केले. हा प्रवास केवळ नवसपूर्तीचा नव्हता, तर शेतकरी बांधवांसाठी लढणाऱ्या लोकप्रतिनिधीच्या कृतज्ञतेचे, श्रद्धेचे आणि जबाबदारीचे प्रतीक ठरला आहे. किल्लारीचे ग्रामदैवत श्री निळकंठेश्वर यांच्या कृपेने संपूर्ण गळीत हंगाम निर्विघ्न आणि यशस्वी पार पडेल, असा विश्वास पवार यांनी यावेळी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT