jitesh Antapurkar
jitesh Antapurkar Sarkarnama
मराठवाडा

बाप से बेटा सवाई ः काॅंग्रेसचे जितेश अंतापूरकर दुप्पट मताधिक्याने विजयी

जगदीश पानसरे

नांदेड ः संपुर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या देगलूर-बिलोली विधानसभा निवडणुकीत अखेर अपेक्षेप्रमाणे काॅंग्रेसचे जितेश अंतापूरकर हे तब्बल ४२ हजार मतांची आघाडी घेऊन विजयी झाले आहेत. त्यांच्या या विजयाने `बाप से बेटा सवाई`, अशी चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे. अखेरच्या फेरीनंतर निकालाची घोषणा करण्यात आली तेव्हा काॅंग्रेस महाविकास आघाडीचे जितेश अंतापूरकर यांना १,०८,७८९ मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे सुभाष साबने यांना ६६ हजार ८७२ एवढी मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीला गेल्या निवडणुकीतील मतांपेक्षा कमी मते मिळाली असून डाॅ.उत्तम इंगोले यांना ११,३४७ मतांवर समाधान मानावे लागले आहे.

जितेश अंतापूरकर यांनी तब्बल ४१,९३३ मतांची आघाडी घेत दणदणीत विजय मिळवला आहे. पंढरपूर पोटनिवडणुकीची पुनरावृत्ती करण्याची भाषा करणाऱ्या भाजपला देगलूर-बिलोलीच्या मतदारांनी नाकारले आहे. महाविकास आघाडीच्या विजयाने पालकमंत्री अशोक चव्हाण हे खूष झाले असून या निकालाने सरकार अधिक भक्कम झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना दिली.

मुख्यमत्री उद्धव ठाकरे यांनी देखील या विजयाबद्दल अशोक चव्हाण यांचे अभिनंदन केले आहे. रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोनामुळे निधन झाले होते. त्यानंतर ही पोटनिवडणूक जाहीर झाली होती. काॅंग्रेसने जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी दिली, तर भाजपने शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांना मैदानात उतरवले होते.

अशोक चव्हाण, खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांची प्रतिष्ठा या निमित्ताने पणाला लागली होती. पण नांदेड जिल्ह्यात अशोक चव्हाण यांचाच अवाज असल्याचे आजच्या निकालावरून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. आज सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली, तेव्हा पहिल्या फेरीपासूनच काॅंग्रेसचे अंतापूरकर हे आघाडीवर होते. शेवटच्या फेरीपर्यंत त्यांनी ही आघाडी टिकवून ठेवली आणि विजयावर शिक्कामोर्तब केले.

मिळालेली मते

जितेश अंतापूरकर ( काॅंग्रेस आघाडी) -१,०८,७८९ (विजयी)

सुभाष साबणे (भाजप)- ६६,८७२

डाॅ.उत्तम इंगोले (वंचित बहुजन आघाडी)-११,३३४

नोटा-११०३

टपाली मतदान

जितेश अंतापूरकर-५१

सुभाष साबणे-३५

उत्तम इंगोले-०१

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT