Bacchu Kadu leading the farmers’ protest on the Nagpur-Hyderabad highway demanding complete loan waiver and other key reforms. Jarange Patil’s arrival strengthens the movement. Sarkarnama
मराठवाडा

Bacchu Kadu Farmers Protest : शेतकरी आंदोलनाची धग आणखी वाढणार! बच्चू कडू फडणवीसांशी चर्चा करण्यासाठी मुंबईला निघाले असतानाच जरांगे पाटील नागपूरच्या दिशेने रवाना

Jarange Patil Support Bacchu Kadu Farmers Protest : शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यासाह 22 विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. त्यांच्या या आंदोलनामुळे नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

Jagdish Patil

Jalna News, 30 Oct : शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यासाह 22 विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आलं आहे.

अशातच आता आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बच्चू कडूंना मुंबईत चर्चेसाठी निमंत्रण दिलं आहे. तर ते निमंत्रण कडू यांनी स्विकारलं आहे. सुरूवातीला कडू यांनी मुंबईत न जाण्याची भूमिका घेतली होती. मात्र, अखेर त्यांनी चर्चेसाठी जाण्याचा निर्णय घेतला आहे.

मात्र, ते चर्चेला गेले तरी राष्ट्रीय महामार्गावरील ठिय्या आंदोलन नियोजित ठिकाणी सुरूच राहणार असल्याचही कडू यांनी जाहीर केलं आहे. बच्चू कडू यांच्या आंदोलनाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. अशातच आता त्यांच्या आंदोलनाची धग आणखी वाढणार आहे.

कारण मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे देखील बच्चू कडू यांच्या आंदोलनात सहभागी होणार आहेत. कडूंच्या आंदोलनामा पाठिंबा देण्यासाठी जरांगे पाटील नागपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत.

नागपुरला जाण्यापूर्वी माध्यमांशी बोलताना जरांगे म्हणाले, 'तिथल्या आंदोलकांना त्रास होतोय, सगळे शेतकरी नागपूरला बसला आहेत. जेव्हा अटीतटीची वेळ असते. तेव्हा आपण शेतकऱ्यांसाठी सहकार्य केलं पाहिजे.

खंबीरपणाने शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभं राहिला पाहिजे म्हणून मी नागपूरकडे निघालोय, असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे आता जरांगे पाटील थेट आंदोलन स्थळी जाणार असल्याने आंदोलनाला आणखी बळ येणार असल्याचं बोललं जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT