Bageshwar Dham News Sarkarnama
मराठवाडा

Bageshwar Dham News : `बागेश्वर धाम सरकार` थेट शेतकऱ्याच्या घरी, जमीनीवर बसून चहाही घेतला..

Jagdish Pansare

Marathwada BJP News : आपल्या उच्च राहणीमान आणि खासगी विमान प्रवासामुळे टीकेचे धनी ठरणाऱ्या बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांचे वेगळेच रुप आज पहायला मिळाले. रामकथा आणि दरबारासाठी तीन दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर शहरात वास्तव्यास असलेल्या धीरेंद्र शास्त्री यांनी एका शेतकऱ्याच्या घरी जाऊन चहा घेतला. (Bageshwar Dham News) कुठलेही आसन नाही, बडदास्त नाही, तर थेट घरासमोरच्या अंगणात धीरेंद्र शास्त्री जमीनीवर बसले आणि शेतकरी कुटुंबातील वृद्ध महिलेच्या पाया पडत आशिर्वादही घेतले.

धीरेंद्र शास्त्री यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॅा. भागवत कराड (Dr.Bhagwat Karad) यांच्यासह वेरुळ येथील घृष्णेश्वर आणि खुलताबादच्या भद्रा मारोतीचे दर्शन घेतले. दोन्ही ठिकाणी शास्त्री यांनी मनोभावे पुजाअर्चा, अभिषेक केला आणि संभाजीनगरात परतत असतांना शेतकरी कुटुंबाची भेट घेऊन तिथे चहा पिण्याची इच्छा व्यक्त केली. (BJP) भद्रामारोतीचे दर्शन घेऊन बाहेर पडल्यानंतर शास्त्री यांच्या वाहनाचा ताफा फुलंब्री रोडवरील भीमराव आणि सुभाष फुलारे यांच्या घरासमोर थांबला.

महाराजांनी चहा पिण्याची इच्छा व्यक्ती केली, पण सोबत भक्त मंडळी आणि इतरांची एवढी गर्दी होती की घरात जाऊन बसणे शक्यच नव्हते. (Marathwada) मग काय महाराजांनी गाडीतून उतरून थेट जमीनीवरच ठाण मांडले. फुलारे कुटुंबातील सदस्यांशी महाराजांनी चहा येईपर्यंत चर्चा केली. तेवढ्यात या कुटुंबातील वृद्ध महिला महाराजांच्या दर्शनासाठी आल्या. पायावर डोकं ठेवून दर्शन घेतल्यावर धीरेंद्र शास्त्रींनीही या माऊलीच्या पायावर डोकं ठेवत आशिर्वाद घेतले.

तेव्हा या वृद्ध महिलेच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. आपल्या खिशातून एक पुडी काढत महाराजांनी त्यांना दिली आणि ती कपाळावर लावण्यास सांगितले. महाराजांसाठी चहा आला, तो त्यांनी आपल्या जवळील पात्रात घेतला आणि पिले. यावेळी कराडही महाराजांच्या शेजारी जाऊन बसले. यावेळी उपस्थितांनी हे दृष्य आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केले. धीरेंद्र शास्त्री महाराजांच्या साधेपणाची सर्वत्र चर्चा होत आहे. बागेश्वर धाम आपल्या घरी आल्यामुळे आमचे भाग्य उजळले, अशी प्रतिक्रिया फुलारे कुटुंबाने व्यक्त केली आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT