MP Bajrang Sonwane On Shivraj Divate News Sarkarnama
मराठवाडा

Bajrang Sonawane News : परळीत तीन दशकांची सत्ता म्हणूनच हा माज! खासदार बजरंग सोनवणेंचा संताप..

MP Bajrang Sonawane blames power monopoly for incidents in Parli, sharply criticizing Munde's dominance in the region’s politics. : काल अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी पाच आरोपींना 20 मेपर्यंत पोलिस कोठडी सुणावण्यात आली आहे.

Jagdish Pansare

Beed Political Crime : शिवराज दिवटे या युवकाला अपहरण करून मारहाण झाल्यानंतर बीड जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. तुझा संतोष देशमुख पार्ट टू करू, अशी धमकी मारहाण करणाऱ्या आरोपींनी दिल्यानंतर या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी आज शिवराज दिवटे याची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. त्यानंतर त्याचा वडीलांशीही त्यांनी चर्चा केली. परळीत 1992 पासून एकहाती सत्ता असल्याने या सत्तेचाच हा माज असल्याची संतप्त प्रतिक्रिया सोनवणे यांनी दिली.

या अपहरण आणि हल्ला प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा, अशी मागणी करतानाच पोलीस अधीक्षक दर्जाचा एक विशेष अधिकारी आणि कर्मचारी या प्रकरणाच्या चौकशीसाठी द्या, यासाठी आपण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे सोनवणे (Bajarang Sonawane) यांनी माध्यमांना सांगितले. शुक्रवारी परळीतील गुन्हेगारांच्या एका टोळक्याने शिवराज दिवटे या तरुणाला उचलून जवळच्या जंगलात नेते लाठ्याकाठ्या, बेल्ट, रॉडने बेशुद्ध होईपर्यंत बेदम मारहाण केली.

परळीजवळील रत्नेश्वर मंदिराच्या आवारातील जंगलात हा प्रकार घडला. दहा ते बारा जणांच्या टोळक्याने ही मारहाण केली, त्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल केला. (Beed News) गंभीर जखमी अवस्थेत त्याला उपचारासाठी आंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खासदार बजरंग सोनवणे यांनी शिवराज दिवटे याची आज भेट घेतली. तसेच त्याच्या वडिलांशी देखील चर्चा केली.

काल अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी पाच आरोपींना 20 मेपर्यंत पोलिस कोठडी सुणावण्यात आली आहे. रोहित मुंडे (रा. डाबी), प्रशांत कांबळे (रा. परळी), सुरज मुंडे (रा. टोकवाडी) व स्वराज गित्ते (रा. परळी) यांच्यासह अनोखळी दहा आरोपी फरार आहेत. फरार आरोपींना अटक करा, सर्वांवर मकोका अंतर्गत कारवाई करा, या मागणीसाठी बीड बंदची हाक तर बीड-परळी रोडवरील गोपीनाथ गडाच्या रस्त्यावर ग्रामस्थांनी रास्तारोको केला आहे.

या पार्श्वभूमीवर खासदार बजरंग सोनवणे यांनी संताप व्यक्त केला. जिल्ह्यात वारंवार हल्ले, दरोडे, खूनाचे प्रयत्न अशा घटना घडत आहेत. त्या रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक दर्जाचा एक विशेष अधिकारी व त्याला काही कर्मचारी अशा पद्धतीने नियुक्ती करावी या मागणीसाठी मी उपमुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार असल्याचे सोनवणे म्हणाले. परळीमध्ये 1990 - 92 पासून सत्ता आहे आणि या सत्तेची मस्ती अनेकांना आली आहे, त्यातूनच असे प्रकार घडत असल्याचा आरोप बजरंग सोनवणे यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT