Mla Suresh Dhas-Mla Balasaheb Ajbe News
Mla Suresh Dhas-Mla Balasaheb Ajbe News Sarkarnama
मराठवाडा

Dhas : बाळासाहेब आजबे झुरळासारखे, पेव्हर ब्लॉक बसवण्याशिवाय त्यांनी काही केले नाही..

सरकरानामा ब्युरो

बीड : बाळासाहेब आजबे झुरळासारखे आलेले आमदार आहेत. केवळ पेव्हर ब्लॉक बसविणे यापेक्षा त्यांनी काहीही काम केले नाही. (Beed) पाटोदा व शिरुर कासार नगर पंचायतींचे विकास आराखडे शंभर टक्के नामंजूर करणे अशीच कामे करत अडीच वर्षांत त्यांनी ७५ टक्के वेळ विकास कामांचे नियोजन करण्याऐवजी मला आणि माझ्या कुटुंबीयांना गुन्हेगारी खटल्यात अडकवण्याचे षड्यंत्र करण्यात घालविल्याचा टोला आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी लगावला.

भाजप आमदार सुरेश धस विकासाला लागलेली किड असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब आजबे (Balasaheb Ajbe) यांनी केला होता. त्याला धस यांनी प्रत्युत्तर दिले. धस म्हणाले, माहिती अधिकार कार्यकर्ते, राॅकेल टाकणारे, तक्रारखोर कार्यकर्त्यांचे कोंडाळे जवळ ठेवून त्यांनी मला त्रास द्यायचा प्रयत्न केला. माझ्याविरुद्ध खोटे-नाटे गुन्हे दाखल झाले. परंतु त्यांच्याच शासनाच्या काळामध्ये सदरील गुन्हे हे डीवायएसपींना पुरावे सापडले नसल्यामुळे थांबवण्यात आलेले आहेत.

उलट आजबे हे आष्टी नगरपंचायतीच्या विकास कामात अडचणी आणत होते. त्यांनी तक्रारी केलेली घमेलेभर पत्रे माझ्याकडे आहेत. पण जनतेने त्यांना नगरपंचायत निवडणुकीत जागा दाखवून दिली आहे. अगदी अर्धे मंत्रिमंडळ देखील त्यांनी निवडणुकीमध्ये आणले होते. परंतु तीनही ठिकाणी मिळून त्यांना चार ते पाच जागा मिळाल्या आहेत. आजबे यांनी एसआयटी स्थापन केल्या,परंतु नवाब मलिक जेलमध्ये गेले आहेत.

माझी मालमत्ता १००० कोटीची आहे असे ते सांगत होते. परंतु माझी मालमत्ता पन्नास कोटींची सुद्धा कधीच नव्हती. माझ्याविरुद्ध विशेष तपास पथक यंत्रणा लावली, आजबेंचा विकास कामाचा नमुना म्हणजे हायमॅक्स. त्यांनी हे दिवे अनेक ठिकाणी लावले. परंतु त्यातला एक तरी आहे चालू असलेला मला त्यांनी दाखवून द्यावा, अशी टीकाही धस यांनी केली. आजबे हे पात्रता नसताना आमदार झालेले आहेत. अडीच वर्षात त्यांनी फक्त स्वतःचेच घर भरले आहे.

सार्वजनिक कामाकडे त्यांचे कधीच लक्ष नव्हते. माझ्यावर देवस्थान जमिनीचा आरोप करताना त्यांनी स्वतःकडे पाहणे आवश्यक होते. दादेगाव येथील श्रीराम देवस्थानाची सातशे एकर जमीन आहे. त्यातली साडेतीनशे एकर जमीन कोण वापरते तसेच इनामी जमिनीत कोणाकोणाचे पेट्रोल पंप आहेत, कोणाचे मंगल कार्यालये आहेत, कोणाचे खडीक्रेशर आहे, कोणाच्या शाळा आहेत या सर्व कागदपत्रांची जमवाजमव मी करीत आहे, असा इशाराही धस यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT