Mp Imtiaz Jalil-Let. Balasaheb Thackeray News Sarkarnama
मराठवाडा

Imtiaz Jalil News : बाळासाहेब ठाकरेंना राजकीय दुकान चालवायचे होते, म्हणून शहराचे नाव बदलले..

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजी महाराजांचा आणि औरंगाबादचा काय संबंध होता, हे कुणी आम्हाला सांगावे.

Jagdish Pansare

Aimim : कोण एक बाळासाहेब ठाकरे इथे आले, त्यांना त्यांचे राजकीय दुकान इथे चालवायचे होते. गड मजबुत करायचा होता म्हणून त्यांनी सांगितले या शहराचे नाव औरंगाबाद (Aurangabad) नाही, संभाजीनगर आणि तेव्हापासून हे राजकारण सुरू झाले. कुण्या एका व्यक्तीने सांगितले म्हणून शहराचे नाव बदलणे कितपत योग्य आहे? असा सवाल खासदार इम्तियाज जलील यांनी केला.

औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नामांतर करण्याच्या राज्याच्या निर्णयाला केंद्राने मंजुरी दिली. त्यानंतर या नावावरून राज्यात राजकारण सुरू झाले आहे. (Aimim) एमआयएमने या नामांतराला तीव्र विरोध करत केंद्र आणि राज्य सरकारची कोंडी करण्यासाठी मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर या शहरांची नावे बदलण्याची मागणी केली. या शहराच्या नावातून कुठलाच अर्थ बोध होत नाही, त्यामुळे या शहरांची नावे अनुक्रमे छत्रपती शिवाजी महाराज महानगर, फुले, आंबेडकर नगरी, शाहू नगर असे करण्यात यावे, असे आवाहन इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी पत्रकार परिषदेतून केले.

इम्तियाज जलील म्हणाले, सोळाशेच्या दशकात ज्या मलिक अंबरने ज्यांनी नामांतराची मागणी केली त्यांच्या बाप जाद्यांना पाणी पाजण्याचे काम केले, त्यांच्या नावाचा विचार नाव बदलतांना का केला नाही ? किंवा खडकी या जुन्या नावाचा पुन्हा विचार का केला गेला नाही? महापुरुषांच्या नावाने राजकारण करण्यासाठीच हा घाट घालण्यात आला आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा आणि औरंगाबादचा काय संबंध होता, हे कुणी आम्हाला सांगावे.

ते बाळासाहेब ठाकरे मुंबईतून इथे आपले राजकीय दुकान घेवून आले, त्यांनी ती इथे चालवायची होती, इथे आपला गड मजबुत करायचा होता, म्हणून त्यांनी आपल्या राजकीय स्वार्थासाठी या शहराला संभाजीनगर म्हणायला सुरूवात केली. शिवसेना-भाजप आणि सगळ्यांच पक्षांनी यावर राजकारण केले आणि शहराचे नामांतर केले. मग मी सुचवलेल्या शहरांची नावे देखील बदला, केंद्रात आणि राज्यात तुमचे सरकार आहे.

सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे, सरकारने ठराव मंजुर करून घ्यावा, आम्ही, आमचे दोन आमदार देखील त्याला पाठिंबा देतील, असे आवाहन देखील इम्तियाज जलील यांनी केले. बिहारमधील औरंगाबाद तुम्हाला चालते, विशेष म्हणजे तिथे भाजपचा खासदार आहे. संसदेत आम्ही सोबत काम करतो. त्यांना औरंगाबाद चालते, मात्र इथे महाराष्ट्रात या नावाला तुमचा विरोध म्हणजे दुटप्पीपणा असल्याची टीका देखील इम्तियाज यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT