Bjp Mla Prashant Bamb
Bjp Mla Prashant Bamb Sarkarnama
मराठवाडा

Bamb : शिक्षकांना मोर्चा काढणे शोभत नाही ; जनतेला ही मुजोरी आवडणार नाही..

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांविरुद्ध सुरू केलेली मोहिम काम करू लागली आहे. (Aurangabad) जिल्हा परिषदेचे सीईओ आणि गटशिक्षण अधिकाऱ्यांनी मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांना नोटीस बजावली असून यामध्ये घरभाडे आणि वेतनवाढ रोखण्याचा इशारा दिला आहे. परंतु (Prashant Bamb) बंब यांचे एवढ्यावर समाधान झालेले दिसत नाही, त्यामुळे त्यांनी आणखी एक पत्र पाठवत मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांचे वेतनच रोखा अशी मागणी केली आहे.

शिक्षकांनी मुख्यालयी राहण्याऐवजी बंब यांच्या विरोधातच उद्या मोर्चा काढण्याची तयारी सुरू केली आहे. (Teacher) यावर शिक्षकांना मोर्चा काढणे शोभत नाही, ही मुजोरी जनतेला आवडणार नाही,असा टोला देखील बंब यांनी शिक्षकांना लगावला आहे. पावसाळी अधिवेशनात शिक्षकांच्या मुख्यालयी न राहता फुकट घरभाडे घेण्याचा मुद्दा आमदार बंब यांनी उपस्थितीत केला होता. त्यानंतर संतप्त झालेल्या शिक्षकांनी बंब यांच्याविरोधात आघाडी उघडली होती.

संघटनाचा दबाव, निदर्शने, आंदोलने केल्यानंतर बंब शांत बसतील असा त्यांचा अंदाज होता. पण उलट बंब अधिक आक्रमक झाले आणि त्यांनी शिक्षकांसह त्यांना पाठिशी घालणाऱ्या शिक्षक व पदवीधर आमदारांच्या विरोधात देखील आक्रमक पावित्रा घेतला. बंब यांच्या भूमिकेला समाजातून देखील पाठिंबा मिळत आहे आणि प्रशासनाने देखील त्याची दखल घेत मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

घरभाडे रद्द करण्याचा इशारा शिक्षण विभागाने दिल्यानंतर बंब यांनी आता त्याच्या एक पाऊल पुढे जात अशा शिक्षकांचे ते जोपर्यंत मुख्यालयी राहत नाहीत, तोपर्यंत पगारच रोखा, अशी मागणी केली आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे बंब यांच्या आरोप आणि मागणी विरोधात शिक्षक संघटना एकवटल्या असून उद्या औरंगाबादेत मोर्चा काढण्याच्या तयारीत आहेत.

राज्यभरातील शिक्षक आणि शिक्षक, पदवीधर आमदार या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत. यावर बंब यांनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शिक्षकांचा हा मुजोरपणा आहे, त्यांना मोर्चा काढणे शोभत नाही, त्यांनी एकदा विचार करावा, आपल्या लोकप्रतिनिधींशी चर्चा करून निर्णय घ्यावा, असे आवाहन देखील बंब यांनी केली आहे.

मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांचे पगार रोखा या मागणीवर आपण ठाम असून यासाठी मुख्यमंत्री, शालेय शिक्षण मंत्र्यांची देखील आपण भेट घेणार असल्याचे स्पष्ट केले. माझ्या मतदारसंघापासून याची अंमलबजावणी करा आणि संपुर्ण राज्यात हे धोरण राबवावे यासाठीच माझा लढा असल्याचेही बंब यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT