Mla Santosh Bangar - Ashish Shelar Sarkarnama
मराठवाडा

Mla Santosh Bangar News : बांगर शेलारांच्या पाया पडले, ठाकरे गट म्हणतो आता हेच करा ..

Shivsena News: वाद आणि धमकी, मारहाणीच्या घटनांमुळे बांगर चर्चेत राहिले. आता शेलारांच्या पाया पडल्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले

सरकारनामा ब्युरो

Budget Session News : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली ४० आमदारांचे बंड, त्यांचा मुंबई, सुरत-गुवाहाटी-गोवा प्रवास आणि त्यानंतर मिळालेले मुख्यमंत्रीपद यावर देशभरात चर्चा अजूनही होते. ज्या शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या ४० आमदारांमुळे उध्दव ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपद गेले त्या सगळ्यांना ठाकरे गट गद्दार म्हणून डिवचतो.

एवढेच नाही तर ५० खोके घेवून विकले गेले असा आरोप देखील त्यांच्यावर होतो. भाजप हा युज अॅन्ड थ्रो चा पक्ष आहे, तेव्हा गरज संपल्यानंतर या गद्दारांचे काय होते पहा ? असा इशारा देखील ठाकरे गटाचे नेते देतात. (Santosh Bangar) आजपासून सुरू झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यानचा एक व्हिडिओ सध्या चांगलेच चर्चेत आला आहे. (Ashish Shelar)

ज्यामध्ये कळमनुरीचे आमदार संतोष बांगर हे भाजप नेते आमदार आशिष शेलार यांच्या पाय पडतांना दिसत आहेत. विधीमंडळ परिसरात समोरासमोर आले तेव्हा शेलार यांनी संतोष बांगर यांच्याशी हस्तांदोलन केले. एक हात हातात घेतल्यानंतर बांगर दुसऱ्या हाताने शेलारांच्या पायाही पडले. हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होताच ठाकरे गटाकडून बांगर यांना डिवचण्यात येत आहे.

गद्दारांना असेच झुकावे लागणार, यापुढे आणखी काय काय करावे लागेल हे पहा? अशा शब्दांत बांगर यांचा समाचार घेतला जात आहे. विशेष म्हणजे संतोष बांगर हे शिंदे यांच्या बंडात सुरुवातीला सहभागी झाले नव्हते. उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहणार हे सांगतांना ढसाढसा ते रडले होते. त्यांच्या एकनिष्ठतेचे कौतुक म्हणून तेव्हा हिंगोलीत त्यांचा जंगी सत्कार देखील करण्यात आला.

परंतु शिंदे यांचे बंड यशस्वी झाले, ते मुख्यमंत्री झाले आणि जेव्हा सभागृहात सरकारवर विश्वास मत टाकण्याची वेळ आली, तेव्हा बांगर शिंदे गटात सहभागी झाले. विधानसभा अध्यक्ष निवडीच्या वेळी ठाकरे गटासोबत बसलेले बांगर दुसऱ्याच दिवशी शिंदे गटात गेल्याने सर्वांनाच धक्का बसला होता. त्यानंतर सततच्या वाद आणि धमकी, मारहाणीच्या घटनांमुळे बांगर चर्चेत राहिले. आता शेलारांच्या पाया पडल्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT