MLA Santosh Bangar, Hingoli Latest News
MLA Santosh Bangar, Hingoli Latest News Sarkarnama
मराठवाडा

Santosh Bangar News : सरकारमध्ये असलो म्हणून काय आम्ही बांगड्या भरल्यात का ?

सरकारनामा ब्युरो

Aurangabad : हो, मी त्या प्राचार्याला मारलं, कारण त्याने एका महिलेवर अन्याय केला होता. सरकार आमचे असले तरी जिथे अन्याय होत असले तिथे आवाज उठवणा, त्याविरोधात लढा देणं हे शिवसैनिकाचे कर्तव्यच आहे. त्यामुळे सरकारमध्ये असलो तरी आम्ही बांगड्या भरलेल्या नाहीत, अन्याय करणाऱ्याला धडाच शिकवू. महिलेवर अन्याय, अत्याचार होत असले तर छत्रपतींच्या महाराष्ट्रात हे सहन केले जाणार नाही, अशा शब्दात आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी मारहाणीचे समर्थन केले.

औरंगाबादेतील विभागीय आयुक्त कार्यालयात बैठकीसाठी आलेल्या संतोष बांगर यांनी मारहाणीच्या व्हिडिओबद्दल स्पष्टीकरण दिले. (Shivsena) बांगर म्हणाले, अन्यायाविरोधात लढा देणे शिवसैनिकाचे कर्तव्य आहे. त्या प्राचार्याने एका महिलेवरती अन्याय केला होता. (Hingoli) त्यामुळे माहिलेवर अत्याचार होताना छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात संतोष बांगर सहन करणार नाही. यासाठी माझ्यावर गुन्हा दाखल झाला तरीही चालेल.

तसेच संबंधित महिलेची इज्जत चव्हाट्यावर येऊ नये, म्हणून आम्ही गप्प बसलो. अन्यथा प्राचार्यावर गुन्हा दाखल झाला असता. घटना होऊन आठ दिवस झाले असताना त्या प्राचार्यांने माझ्यावर गुन्हा का दाखल केला नाही, असाही प्रश्न बांगर यांनी उपस्थित केला. आमदार संतोष बांगर यांच्याकडून एका व्यक्तीला मारहाण होत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

यामध्ये हिंगोली शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्राचार्य अशोक उपाध्याय यांना बांगर मारहाण करत असल्याचे समोर आले होते. केवळ बांगरच नाही, तर त्यांच्या समर्थकांनी देखील प्राचार्यांना मारहाण केल्याचे व्हिडिओतून स्पष्ट होते. महिलेची छेड केल्याने मारहाण केल्याचा दावा बांगर यांच्याकडून करण्यात येत आहे. परंतु या प्रकरणात कुठलीही तक्रार न झाल्यामुळे अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.

बांगर यांच्या वाद आणि त्यातून धमकावणे, शिवीगाळ, मारहाणीच्या अनेक घटना गेल्या काही काळात समोर आलेल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात बांगर यांना यापुर्वी समज देखील दिली होती. पण त्याचा काही परिणाम झालेला दिसत नाहीये. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणीवस यांनी देखील या प्रकरणावर भाष्य करणे टाळले. फडणवीसांनी केवळ चौकशी करुन योग्य कारवाई करू, असे म्हणत या विषयावर अधिक बोलणे टाळले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT