Aurangabad News : भाजपच्या मिशन लोकसभेला चंद्रपूर आणि औरंगाबादेतील जाहीर सभेने सुरुवात झाली. चंद्रपूरातील सभेला गर्दी जमली, (Aurangabad)औरंगाबादेत मात्र फज्जा उडाला. नड्डांचे भाषण सुरू असतांना लोक उठून गेल्याने भाजपची नाचक्की झाली. या फ्लाॅप सभेवरून टीका सुरू असली तरी भाजपचा उत्साह काही कमी झालेला नाही.
औरंगाबाद लोकसभेची जागा भाजप दोन लाख मतांनी जिंकणार, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule) यांनी केला आहे. (Bjp) भाजपच्या मिशन ४५ मध्ये शिंदेसेनेला किती जागा मिळणार? असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, परभणी, हिंगोली आणि उस्मानाबाद या लोकसभा मतदारसंघावर भाजपने दावा केला आहे.
अधिकृत घोषणा झाली नसली तरी भाजपने आपल्या लोकसभा प्रवास संकल्प अभियानात या चारही मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. एकीकडे भाजप आणि शिंदे यांची शिवसेना एकत्रितपणे लोकसभेच्या ४५ आणि विधानसभेच्या २०० जागा जिंकणार असा दावा भाजपकडून केला जातोय. पण शिंदेसेनेला लोकसभेच्या कुठल्या जागा देणार हे मात्र नेते स्पष्ट करायला तयार नाहीत.
औरंगाबादेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची सभा फसली. याची चर्चा अजूनही राजकीय वर्तुळात सुरू आहे. पण या एका सभेचे काय घेवून बसलात, यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या सभा बघा कशा होतात? असे म्हणत बावनकुळे यांनी औरंगाबाद लोकसभेची जागा दोन लाख मतांनी जिंकणार असल्याचा दावा केला.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना जिल्ह्यात भाजपची ताकद नसतांना उगाच बेडक्या फुगवण्याचा हा प्रकार असल्याची टीका केली होती. यावर बावनकुळे यांनी दानवेंना टोला लगावला. शिंदेची शिवसेना आणि भाजप समन्वयाने लोकसभेच्या ४५ जागा एकत्रित लढणार असल्याचा पुनरुच्चार देखील बावनकुळे यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.