Sharad Pawar, Supriya Sule, Amarsingh Pandit
Sharad Pawar, Supriya Sule, Amarsingh Pandit Sarkarnama
मराठवाडा

Beed : पंडित कन्येच्या विवाहाला तिन्ही पवारांसह बड्या नेत्यांची उपस्थिती

सरकारनामा ब्युरो

बीड : जेष्ठ नेते माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांची नात व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांची कन्या डॉ. पद्मांजली यांचा विवाह सोहळा आणि स्वागत समारंभाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह अनेक मंत्री आणि बड्या नेत्यांनी हजेरी लावली. (Beed) यावरुन अमरसिंह पंडित यांची राजकीय उठबस आणि जिव्हाळ्याचे संबंध याचा प्रत्यय आला.

अमरसिंह पंडित यांची सौंदर्यतज्ज्ञ या विषयात वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या कन्या डॉ. पद्मांजली यांचा विवाह सनदी अधिकारी गोविंदराव बोडके पा. यांचे चिरंजीव मयुरेश यांच्यासोबत रविवारी (ता. २५) पुण्यात शाही पद्धतीने पार पडला. (Maharashtra) रविवारी सकाळी ०९ : ४५ वाजता पुणे येथील वेस्ट इन या हॉटेलमध्ये विधिवत पद्धतीने विवाह झाला.

यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री राजेश टोपे, खासदार सुप्रिया सुळे, राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे, विधान सभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारीणीच्या कायम निमंत्रीत सदस्या आणि हिमालच व जम्मू काश्मिर काँग्रेस प्रभारी खासदार रजनी पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे.

आमदार प्रकाश सोळंके, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी मंत्री अशोक पाटील, आमदार सतीश चव्हाण, विक्रम काळे, बाळासाहेब आजबे, राहुल पाटील, निरंजन डावखरे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. यानंतर सायंकाळी सात वाजता अक्षता व स्नेहमिलन कार्यक्रमालाही उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, माजीमंत्री राधाकृष्ण विखे, खासदार सुनिल तटकरे यांच्यासह माजी आमदार जयवंत जाधव, माजी आमदार राजन पाटील, रविंद्र फाटक, श्यामसुंदर शिंदे.

याशिवाय मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विश्‍वास जाधव, न्यायमूर्ती साधना जाधव, पुणेचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, राज्य परिक्षा परिषदेचे आयुक्त रविंद्र जगताप, पोलीस उपायुक्त रामनाथ पोकळे, रमेश आडसकर, राजेश्वर चव्हाण, राजेसाहेब देशमुख, राजेंद्र मस्के आदी दिग्गज मंडळी उपस्थित होती.

पवार कुटूंबातील सर्वांचीच हजेरी अशा क्वचितच घडणाऱ्या प्रसंगात पंडित कन्येचा विवाह देखील आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे या दोन्ही कार्यक्रमांना सहकुटूंब पुर्णवेळ उपस्थित होते. जेष्ठ नेते शिवाजीराव पंडित, वरपिता अमरसिंह पंडित, जयसिंह पंडित, विजयसिंह पंडित यांनी पाहुण्यांचे आदरतिथ्य केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT