Pankaja Munde sarkarnama
मराठवाडा

Pankaja Munde Election Defeat : 'लोकसभा लढवण्याची इच्छा नव्हती'; पंकजा मुंडेंनी पराभवामागील खदखद सांगितली

BJP minister Pankaja Munde Maharashtra Lok Sabha elections 2024 : बीड भाजप मंत्री पंकजा मुंडे यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवाचे कारण सांगत, त्यावर मोठे भाष्य केले.

Pradeep Pendhare

BJP Maharashtra Politics : भाजपच्या बीडमधील मंत्री पंकजा मुंडे यांना लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा नव्हती. तसे त्यांनीच सांगितले असून, त्या निवडणुकीमधील पराभवाची कारणं देखील सांगितली आहे.

पंकजा मुंडे यांनी मराठाविरुद्ध ओबीसी असा तीव्र संघर्ष सुरू होता. त्या काळात मी लोकसभा निवडणूक लढवली आणि त्याचा मला फटका बसला, असे म्हटल्या आहेत.

पंकजा मुंडे म्हणाल्या, "लोकसभा निवडणुकीत माझा फक्त सहा हजार मतांनी पराभव झाला. मला निवडणूक (Election) लढवण्याची उत्सुकता नव्ती. मराठा आरक्षणाच्या प्रश्नाने जोर धरला होता. मराठाविरूद्ध ओबीसी, अस संघर्ष तीव्र होता. अशा अडचणीच्या काळात मी लोकसभा निवडणुकीला समोरे गेले. त्याचा मला फटका बसला".

'लोकसभा निवडणुकीला परिस्थिती माझ्याविरोधात होती. त्यामुळे मला पराभव स्वीकारावा लागला. हा पराभव बरच काही शिकवून गेला. पण माझ्या कार्यकर्त्यांनी आत्महत्या सुरू केल्या. मी लोकसभेला हरले, पण माझी मान खाली गेली नाही. पण संतोष देशमुख हत्याप्रकरणात माझी मान खाली गेली', असेही पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी म्हटले.

संतोष देशमुख यांच्या हत्येवर बोलताना, पंकजा म्हणाल्या, "तो माझा कार्यकर्ता होता, त्यामुळे मलाही दुःखं आहे. सत्तेत असताना ती संभाळणं खूप अवघड आहे. कार्यकर्त्यांना संभाळणं त्यात अधिकच अवघड होते. कार्यकर्त्यांना जे करायचे ते करा, असे काही नेत्यांकडून सांगितले जाते. ते चुकीचे आहे". संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे दोन समाजात, जातींत तेढ निर्माण झाल्याचेही पंकजा यांनी कबुली दिली.

'गोपीनाथ मुंडे यांच्याबरोबर बीडचे नाव जोडले गेलेले आहे. पण आता बीडचे नावा वाईट अर्थाने घेतले जाते. बीडमधील सामाजिक ऐक्याला तडा गेला आहे. लोकांच्या आक्रमक भाषणांमुळे समाजांमधील संघर्ष अधिक तीव्र झाला असल्याचे सांगून, वंजारी समाजाला लक्ष केले जाणे हे चुकीचे आहे', असेही पंकजा मुंडे यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT