Crime News : बीड जिल्ह्यातील गुंडागर्दी, गुन्हेगारी कारवाया काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. खंडणी, वाळू माफिया, हाणामारी, गुंडाकडून धमकावण्याचे प्रकार राजेरोसपणे सुरू असतानाच आज बीड जिल्हा न्यायालय परिसरात एका वकीलालाच मारहाण केल्याची घटना घडली. दोन महिला आणि एका व्यक्तीने वकीलाला मारहाण करत शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे.
सदरील वकीलाने आपल्या टेबलसमोर दुचाकी उभी करू नका, असे म्हणताच आरोपी महिला आणि एका पुरूषाने या वकीलांनाच झोडपले. या गोंधळामुळे न्यायालय परिसरात एकच खळबळ उडाली होती. आता मारहाण करणाऱ्या आरोपींविरोधात गुन्हा दाखल करा, अशी मागणी पिडीत वकीलाने केली आहे. या प्रकारामुळे वकीलांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
याप्रकरणी वकील संघाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात महिलेसह इतर दोघांविरोधात तक्रार दिली आहे. न्यायालय परिसरात घडलेल्या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये महिला आणि वकिलामध्ये झटापट झाल्याचे दिसून येते. सदरील घटनेनंतर महिलेनेच वकीला विरोधात तक्रार दिली आहे.
किसन करपे नावाचा व्यक्ती आपल्या काही मित्रांसोबत न्यायालय परिसरात आला होता. त्याने वकील पांडुरंग डोंगरे यांच्या टेबल समोरच आपली दुचाकी पार्क केली. टेबल समोर दुचाकी लावू नका, असे म्हणताच दोघांमध्ये वाद झाला. यात सोबत असलेल्या महिलांनी वकिलाला अश्लील शिवीगाळ करत मारहाण केली. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी करत वकील संघाने शिवाजीनगर पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी केली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.