Police and locals gather at Beed District Hospital after the shocking murder of Yash Dhaka, highlighting rising crime in Beed. Sarkarnama
मराठवाडा

Beed Crime : पत्रकाराच्या मुलाच्या हत्येने बीड पुन्हा हादरलं! वदर्ळीच्या परिसरातच यशला गाठलं अन्...

Criminal Incidents in Beed : बीडमधील गुन्हेगारी काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नसल्याचं दिसत आहे. मागील काही दिवसांपासून अनेक गुन्हेदारीच्या घटना समोर येत असतानाच आता पुन्हा एकदा कारण किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणाची चाकूचे वार करत हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

Jagdish Patil

Beed News, 26 Sep : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर गुन्हेगासाठी सतत चर्चेत असलेल्या बीडमधील गुन्हेगारी काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नसल्याचं दिसत आहे.

मागील काही दिवसांपासून अनेक गुन्हेगारीच्या घटना समोर येत असतानाच आता पुन्हा एकदा कारण किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणाची चाकूचे वार करत हत्या केल्याची आणखी एक खळबळजनक घटना बीड शहरात गुरुवारी रात्री घडली.

या तरुणाच्या हत्येमुळे बीड पुन्हा हादरले आहे. यश ढाका असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव असून तो बीडमधील स्थानिक वर्तमानपत्राचे पत्रकार देवेंद्र ढाका यांचा मुलगा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरात यश देवेंद्र ढाका या तरुणाची किरकोळ कारणावरून निर्घुणपणे हत्या केल्याचं सांगितलं जात आहे. धारदार शस्त्राने यशच्या पोटावर वार करत हत्या केली आहे.

दरम्यान, या हत्येच्या घटनेनंतर नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालय तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयात मोठी गर्दी केली. आरोपीला तत्काळ अटक करावे अशी मागणी नातेवाईकांनी केली. दरम्यान पोलिसांनी सुरज काके नावाच्या एका संशयित आरोपीस ताब्यात घेतले असून या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

मात्र, या हत्येच्या घटनेनंतर बीडमधील गुन्हेगारीचा मुद्दा परत एकदा चर्चेत आला असून थेट हत्या करण्याचं धाडसं गुन्हेगारांचं कसं होतं त्यांना कायद्याचा धाक राहिला नाही का? असा सवाल सामान्य बीडकर उपस्थित करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT