बीड : काही दिवसापूर्वी बीड (beed) जिल्ह्यातील एका अधिकाऱ्याने रिव्हाल्वर द्यावी, अशी मागणी केली आहे. यावरुन भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी राष्ट्रवादीचे नेते (ncp), सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (dhanjay munde) यांच्यावर निशाणा साधला आहे. या विषयावरुन धनंजय मुंडे- पंकजा मुंडे यांच्यात शाब्दीक युद्ध रंगले आहे.
परळी मतदारसंघात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत विविध गावांतील महत्वाच्या सुमारे 62 कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या कामांचे रविवारी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते भूमीपूजन झाले. त्यावेळी धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधला होता.
धनंजय मुंडे म्हणाले, '' 'विकासकामात राजकारण आडवे आणू नका, विकास कामांना केंद्राचा निधी खेचून आणा, आम्ही स्वागत करू विकासाचे राजकारण करा,'' ''विकासाचे राजकारण करावे पण विकासाच्या कामात राजकारण आडवे आणू नये, असा टोमणा धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंना लगावला.
बीडमध्ये काही दिवसापूर्वी एका अधिकाऱ्यांने रिव्हाल्व्हर द्यावी, अशी मागणी केली होती, यावर पंकजा म्हणाल्या की, सध्या जिल्ह्यात काम करणे कठीण झाले आहेत. खोट्या बिलावर सह्या करण्यासाठी धमक्या देणाऱ्या गुत्तेदारापासून संरक्षण मिळावं अशी मागणी करण्याची वेळ अधिकाऱ्यांवर येणं हे दुर्दैव आहे.
'जिल्ह्यातील सत्ताधाऱ्यांना हेच पाहिजे असल्याने अधिकाऱ्यांवर रिव्हॉल्व्हर मागण्याची वेळ आली आहे, माफियाराज बोकाळल्याचा आणखी कोणता पुरावा हवाय? असा सवाल पंकजा मुंडे यांनी केला आहे. ''सर्वच विभागातले अधिकारी याला वैतागले असून जिल्हयात काम करणे त्यांना कठीण झाले आहे. पण तक्रार करायला कुणी धजावत नाही," असे त्या म्हणाल्या.
परळीच्या राजकारणातील मुंडे बहीण-भावाच्या वादात परळीमधील नामांकित जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या वैद्यनाथ महाविद्यालयावर प्रशासक नेमण्यात येणार आहे. दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या ताब्यातील ही शिक्षण संस्था आता नेमकी कोणाच्या ताब्यात जाईल? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. जवाहर एज्युकेशन सोसायटीत संचालक मंडळावरुन पालकमंत्री धनंजय मुंडे आणि भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्यात संघर्ष सुरु आहे.
या संस्थेत सुरु असलेल्या वादामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलसचिव आणि प्रशासक नेमण्यासाठी 4 जानेवारीला त्रिसदस्यीय चौकशी समिती गठित करण्यात आली आहे. ही समिती आपला अहवाल विद्यापीठाकडे सादर करणार आहे. समितीने एकदा चौकशी केल्यानंतर पुन्हा चौकशी करणार आहेत. मुंडे बहीण-भावाच्या या वादात वैद्यनाथ महाविद्यालयावर प्रशासक येण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.