Beed Collector News Sarkarnama
मराठवाडा

Beed News : न्यायालयाकडून बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना दणका, वाहन जप्त!

The vehicle of Beed’s district collector was seized following a court order, highlighting a significant legal action taken in the district. : जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी पैशांच्या पूर्ततेबाबत लेखी न देता ‘तुम्ही वाहन घेऊन जा’, असे सांगितल्याने कोर्टाच्या बेलिफने जिल्हाधिकारी यांचे वाहन माजलगाव न्यायालयात जमा केले.

Jagdish Pansare

Court News : चिखलबीड (ता. वडवणी) येथील तलावात जमीन गेलेल्या तीन शेतकऱ्यांना वाढीव मावेजा देण्याबाबत माजलगाव न्यायालयाने ऑक्टोबर 2015 मध्ये आदेश दिले होते. मात्र, दहा वर्षे लोटत आले तरी 29 लाख 50 हजारांचा मावेजा देण्यात आला नाही. एक तर शासनाने प्रतिज्ञापत्र द्यावे अन्यथा जिल्हाधिकाऱ्यांचे वाहन जप्त करावे, असे आदेश दहा दिवसांपूर्वी माजलगाव येथील सत्र न्यायालयाने दिले होते.

त्यानुसार सोमवारी (ता. 17) जिल्हाधिकाऱ्यांचे वाहन जप्त करत न्यायालयात (Court News) जमा करण्यात आले. चिखलबीड येथील शेतकरी शिवाजी टोगे, संतोष टोगे व बाबू मुंडे यांची जमीन लघुसिंचन तलावासाठी साधारण तीन दशकांपूर्वी शासनाने संपादित केली होती. या जमिनीचा अत्यंत तुटपुंजा मावेजा त्यांना देण्यात आला होता. त्यामुळे या शेतकऱ्यांनी माजलगाव येथील सत्र न्यायालयात धाव घेत दावा दाखल केला होता.

हा दावा न्यायालयाने अंशतः मान्य करून ऑक्टोबर 2015 मध्ये या शेतकऱ्यांना वाढीव मावेजा देण्याबाबत निकाल दिला होता. (Beed News) मात्र, शासनाने काही प्रमाणात रक्कम देऊन संपूर्ण रक्कम देण्यास चालढकल केली. त्यामुळे माजलगाव न्यायालयाचे सह दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) एम.एस. बुधवंत यांनी सदर रकमेला व्याज लावून सदर रक्कम वसूल करण्यासाठी जिल्हाधिकारी यांची भेट घेतली आणि रक्कम अदा करण्याबाबत सूचित केले.

परंतु, जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी पैशांच्या पूर्ततेबाबत लेखी न देता ‘तुम्ही वाहन घेऊन जा’, असे सांगितल्याने कोर्टाच्या बेलिफने जिल्हाधिकारी यांचे वाहन (क्र. एमएच 23, बीसी 2401) कायदेशीर बाबींची पूर्तता करून जप्त करून माजलगाव न्यायालयात जमा केले. शेतकऱ्यांच्या वतीने ॲड. बाबूराव तिडके, एस.एस. मुंडे यांनी बाजू मांडली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT