बीड : शिवसेनेचे माजी आमदार सुनील धांडे यांनी आज मुंबईत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून घेत घरवापसी केली. (Beed) बीड विधानसभा मतदारसंघ हा युतीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला होता तेव्हा सुनील धांडे एकदा विधानसभेवर निवडून गेले होते. परंतु नंतर त्यांना दोनवेळा मोठ्या मतांनी पराभव झाला होता. दरम्यान, धांडे यांनी मनसे पुन्हा (Shivsena) शिवसेना नंतर राष्ट्रवादी आणि आता परत शिवसेना असा राजकीय प्रवास केला.
राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली. एकनाथ शिंदे यांच्या बंडाला ४० हून अधिक आमदारांना पाठिंबा दिल्यामुळे ठाकरे सरकारला सत्ता सोडावी लागली. (Marathwada) अजूनही शिंदेमध्ये शिवसेनेतून आऊटगोईंग सुरू आहे. अशावेळी कधीकाळी पक्षाला जय महाराष्ट्र करून गेलेल्या अनेक नेत्यांची घरवापसी होऊ लागली आहे.
आता एकनाथ शिंदे व इतर आमदारांना गद्दार म्हणणाऱ्या शिवसेनेने कधीकाळी पक्षाशी गद्दारी केलेल्यांना मात्र माफी दिल्याचे यावरून स्पष्ट होते. नांदेड, हिंगोली, औरंगाबाद या मराठवाड्यातील शहरातून अनेकांची घरवापसी झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी जुन्या आमदार, खासदार, पदाधिकाऱ्यांना पक्षात पायघड्या घातल्यामुळे शिवसेनेत देखील प्रवेश सोहळे होऊ लागले आहेत.
युतीमध्ये बीड विधानसभा मतदारसंघ जरी शिवसेनेकडे होता, तरी या जिल्ह्यात शिवसेनेची ताकद आता पहिल्यासारखी राहिलेली नाही. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या मैत्रीखातर शिवसेनेने इथे कधी संघटन वाढीकडे लक्षच दिले नाही. त्यामुळे सुनील धांडे यांचा अपवाद वगळता शिवसेनेला जिल्ह्यात मोठे यश कधी मिळालेच नाही.
सुनील धांडे यांनी यापुर्वी दोनवेळा शिवसेना सोडली होती. मनसे आणि राष्ट्रवादीत काहीकाळ घालवल्यानंतर आता पुन्हा त्यांना शिवसेनेत जावेसे वाटले. माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर शिवसेनेत आल्यापासून धांडे त्यांच्यासोबत वावरतांना दिसत होते. आता त्यांना पक्षात अधिकृत प्रवेश झाला आहे. बीड मतदारसंघात त्यांच्या पक्षप्रवेशाने शिवसेनेला काही फायदा होतो का? हे लवकरच स्पष्ट होईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.