Sachin Jadhav Death Case Sarkarnama
मराठवाडा

Beed GST officer death case : सचिन जाधवर मृत्यू 'गूढ की कटकारस्थान'? प्रकाश आंबेडकर मैदानात, राजकीय वादळाची चाहूल!

Beed GST Officer Sachin Jadhavar Death Case: Wife Mayuri Contacts Police, Prakash Ambedkar Extends Support : GST अधिकारी सचिन जाधवर मृत्यूप्रकरणाच्या चौकशीसाठी पती मयुरी हिने केलेल्या आंदोलनाची दखल वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी घेतली.

Pradeep Pendhare

Beed news today : बीडमधील GST अधिकारी सचिन जाधवर यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात, वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी एन्ट्री घेतली आहे. पतीच्या मृत्यूला जबाबदार असलेल्याविरोधात कारवाई व्हावी यासाठी मयत सचिन जाधवर यांच्या पत्नी मयुरी आणि नातेवाइकांनी पोलिसांकडे पाठपुरावा सुरू केला आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी मयुरी यांच्या पाठपुराव्याची दखल घेत, त्यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधून, तुम्हाला न्याय मिळेपर्यंत पाठीशी आहोत, असे आश्वासन दिले. प्रकाश आंबेडकर यांची या प्रकरणातील एन्ट्रीमुळे, मयत सचिन जाधवर यांचे प्रकरण पुढील काळात प्रशासकीय आणि राजकीय पातळीवर तापणार, असे संकेत आहेत.

बीड (Beed) इथल्या वस्तू व सेवा कर विभागात कार्यरत असलेल्या सचिन जाधवर 16 जानेवारीला त्यांच्या कारमध्ये मृतावस्थेत आढळले होते. सचिन जाधवर यांनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. तसं सचिन यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोट सोडली आहे. सचिन जाधवर यांच्या मृत्यूनंतर त्यांचे वरिष्ठ अधिकारी सहायक आयुक्त दिलीप फाटे हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.

पोलिसांनी (Police) सुरूवातीला त्यांच्याकडे चौकशी देखील केली होती. यानंतर दिलीप फाटे वैद्यकीय रजेचा अर्ज देऊन बेपत्ता झाले. एकप्रकारे ते पसार झाले, असा गंभीर आरोप सचिन जाधवर यांच्या पत्नी मयुरी यांनी केला. याप्रकरणी गुन्हा दाखल व्हावा, यासाठी मयुरी जाधवर आणि त्यांच्या नातेवाईकांनी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केलं होतं.

गुन्हा दाखल होऊन एक महिना होत आला आहे, तरी तपासात प्रगती नाही. यामुळे पोलिस ठाण्यासमोर पुन्हा बेमुदत उपोषण आंदोलन करावे लागत असल्याचे मयुरी जाधवर यांनी सांगितले. यातच प्रकाश आंबेडकर यांनी मोबाईलवर संपर्क साधून, या न्यायाच्या लढाईत तुम्ही कोणताही लढा उभारा, माझं पाठबळ असेल, आरोपी अटक न झाल्यास उपोषणाला मी स्वतः येऊन बसेल, असे आश्वासन दिले आहे, असे मयुरी जाधवर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

ज्यांच्यावर संशय आहे, तो पसार आहे. जामीन मिळवण्यासाठी न्यायालयात जाऊन आला. तिथं त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. तरी देखील पोलिसांकडून त्याला अटक होताना दिसत नाही, पुरावे नष्ट होतात की काय, अशी भीती वाटते आहे, याकडे मयुरी जाधवर यांनी लक्ष वेधलं.

पोलिस तपासात हलगर्जीपणा करताना दिसत आहे. घटनास्थळावरील फिंगर प्रिंटचा फॉरेन्सिक रिपोर्ट नाही. कारमध्ये फूट होतं. त्याची देखील फॉरेन्सिक तपासणी व्हायला हवी होती. ती झालेली नाही. आंबेडकर यांच्याशी झालेल्या चर्चेत देखील हाच मुद्दा उपस्थित केला. प्रशासनाकडून न्याय मिळाला पाहिजे, अशी अपेक्षा मयुरी जाधवर यांनी व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT