Beed Lok Sabha Election 2024: "आतापर्यंत जे जिल्ह्याचे मागासलेपण घालवू शकले नाहीत तेच आता आमची औकात विचारत आहेत. मात्र, तरुणांमध्ये जोष असून आपले परळी तालुक्यातील प्रत्येक गावागावांत जल्लोषात स्वागत होत आहे. एखाद्याला वाघाचं कातडं पांघरणं आणि खरंच वाघ असणे यात फरक आहे. परळी मतदारसंघात वाघाची कातडी पांघरून दादागिरी सुरू आहे." असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे लोकसभा उमेदवार बजरंग सोनवणे (Bajarang Sonawane) यांनी मुंडे बंधू-भगिनीवर हल्लाबोल केला.
बीड (Beed) लोकसभा मतदार संघात बजरंग सोनवणे (Bajarang Sonawane) व भाजपच्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यात चुरशीची लढाई सुरु आहे. तर मुंडेंकडून करण्यात येणार्या आरोपांवर सडेतोड उत्तर देण्यासह जोरदार प्रतिहल्ला देखील सोनवणे करतना दिसत आहेत. अशातच सिरसाळा येथील सभेत बजरंग सोनवणे यांनी मुंडेंवर निशाणा साधला. आम्हाला ऊसाचे बील दिले नाही, असे प्रत्येक गावातील शेतकरी सांगत आहेत. शिवाय यांनी मुकादमांचे पैसे दिले नाहीत, कामगारांचे पैसे दिले नाहीत असा आरोप त्यांनीही मुंडेंवर केला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
या सभेत बोलताना सोनवणे म्हणाले,"माझ्या शेतीत काय पिकते हे मागच्या 15 वर्षांत पाहिले नाही का? माझ्यावर चोर म्हणून आरोप करतात. मात्र खरे चोर हेच आहेत. यांनी शेतकऱ्यांचे पैसे चोरले आहेत. एकाला गाडीत गांजा टाकून तुला संपवेन अशी ते धमकी देतात. एका सभेत जमलेले सर्व नेते फक्त बजरंग सोनवणे या एकाच माणसाबद्दल बोलतात. आत्तापर्यंत बीड जिल्ह्याचे मागासलेपण हे लोक घालवू शकले नाहीत. अशा लोकांनी आमची लायकी काढण्याचा अधिकार नाही," असं सोनवणे म्हणाले.
दरम्यान, काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनीही पिक विम्याबाबत गंभीर आरोप केला. देशमुख म्हणाले, ही लढाई परळी मतदारसंघाची नाही किंवा फक्त बीड जिल्ह्याची राहिलेली नाही. ही लढाई कोण्या पुढाऱ्यांच्या, आमदाराच्या, खासदाराच्या हातात नाही. ही लढाई आता सर्वसामान्य जनतेने हातात घेतली आहे. 2020 साली येथील शेतकऱ्यांनी 2100 कोटींचा विमा भरला. मात्र कंपनीसोबत लागेबांधे करून येथील शेतकऱ्यांच्या हक्काचा विमा पळवण्याचे काम येथील पुढाऱ्यांनी केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
(Edited By Jagdish Patil)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.