Pankaja Munde News  Sarkarnama
मराठवाडा

Pankaja Munde News : 'जरांगेंवर टीका नाही, केली तर मागे घेत नाही, मी गोपीनाथ मुंडेंची औलाद'; पंकजांचा ललकार...

Chetan Zadpe

Beed News : बीड लोकसभा (Beed Lok Sabha) मतदारसंघातील निवडणूक आता चांगलीच रंगात आली आहे. भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनावणे (Bajarang Soanawane) यांच्यात थेट लढत आहे.

या ठिकाणी आता मुंडे आणि मराठा आरक्षणासाठी आंदोलन पुकारणारे मनोज जरांगे पाटील यांच्यातच वाद घडताना दिसत आहे. मी जरांगे यांच्यावर कसलीही टीका केली नाही आणि जर टीका केली असती तर शब्द मागे घेण्याची मला आवश्यकता नाही, मी गोपीनाथ मुंडेंची औलाद आहे, असे मुंडे म्हणाल्या. जे गरिबांसाठी लढत आहेत, अशा जरांगेवर आपण टीका केलेली नाही, असेही त्या म्हणाल्या. (Latest Marathi News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बीडच्या पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) वक्तव्य केल्याची चर्चा होती. यामुळे बीडमधलं वातावरण चांगलं तापल्याचे दिसून आले होते. या वादानंतर अखेर मुंडे यांनी आपण जरांगेंवर काहीच टीका केली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बीड येथील गेवराई तालुक्यातील उमापूर येथे प्रचार सभेत पंकजा मुंडे बोलत होत्या.

काय म्हणाल्या होत्या पंकजा मुंडे?

आष्टी तालुक्यातील उंदरखेल येथे काल झालेल्या सभेत पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनासंदर्भात वक्तव्य केले होते. 'विधानसभेच्या निवडणुकीत आरक्षण मागा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) तुम्हाला आरक्षणाचा शब्द दिला आहे. बाता मारून आणि बेमुदत उपोषण करून आरक्षण मिळत नाही.', अशा शब्दांत पंकजा मुंडेंनी आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून संताप व्यक्त केला होता.

मनोज जरांगेंचा पलटवार -

यानंतर जरांगेंनी 'बाता मारून आणि आमरण उपोषण करून आरक्षण मिळत नाही,' असं म्हणणाऱ्या पंकजा मुंडे यांना मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून संतप्त झालेल्या पंकजा मुंडे यांना त्यांनी स्पष्ट भाषेत सांगितले. 'मी तुमच्या वाटेला गेलो नाही, माझ्या वाटेला जाऊ नका.', अशा स्पष्ट शब्दामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी पंकजा मुंडे यांना उत्तर दिले. बीडमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना जरांगे पाटील यांनी हे वक्तव्य केले आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, 'पंकजा मुंडे (Pankaja Munde) काय म्हणाल्या हे मी ऐकलले नाही. मी त्यांना विरोधक मानलेले नाही, समाजालाही नाही. मी तुमच्या वाटेला गेलो नाही, माझ्या वाटेला जाऊ नका.' त्यामुळे जरांगे पाटील यांचे हे वक्तव्य चर्चेत आले.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT