Dhananjay Munde Sarkarnama
मराठवाडा

Lok Sabha Election 2024 : बेरोजगारांना काम, शेतकऱ्यांच्या उसाला दाम हीच माझी औकात; मुंडेंच्या टीकेला सोनवणेंचं प्रत्युत्तर

Dhananjay Munde On Bajrang Sonawane: "मी एका सामान्य, गरीब कुटुंबातील शेतकऱ्याचा मुलगा आहे. सामान्य जनता माझ्यासोबत असल्याने विरोधक माझी लायकी काय? अशी वैयक्तिक टीका करत आहेत. मात्र शेतकऱ्यांनी रक्ताचे पाणी करून पिकविलेल्या उसाला..."

Dattatrya Deshmukh

Beed Lok Sabha Election 2024: बीड लोकसभा निवडणुकीसाठीचा प्रचार महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जोरदार सुरु आहे. बीडमधून महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे (Pankaja Munde) आहेत. तर आघाडीकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) यांना बीडमधून उमेदवारी देण्यात आली आहे.

प्रचारादरम्यान सोनवणे यांच्या उमेदवारीवर प्रतिक्रिया देताना पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बोचरी टीका केली होती. कोणाची 'औकात' काय आहे हे आम्ही ठरवू, असं वक्तव्य मुंडेंनी केलं होतं. मुंडेच्या याच टीकेला आता सोनवणे यांनी प्रत्तुत्तर दिलं आहे.

मी एका सामान्य, गरीब कुटुंबातील शेतकऱ्याचा मुलगा आहे. सामान्य जनता माझ्यासोबत असल्याने विरोधक माझी लायकी काय? अशी वैयक्तिक टीका करत आहेत. मात्र शेतकऱ्यांनी रक्ताचे पाणी करून पिकविलेल्या उसाला मराठवाड्यात सर्वात जास्त भाव देत, बेकार तरुणांच्या हाताला काम देणे हीच माझी लायकी आहे, असं वक्तव्य सोनवणे (Bajrang Sonawane) यांनी केलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बजरंग सोनवणे यांनी खासगी साखर कारखाना काढून तो यशस्वीपणे चालवला आहे. उसाला चांगला भाव आणि गाळप करण्यातही त्यांचा येडेश्वरी साखर कारखाना आघाडीवर आहे. या कारखान्याच्या यशस्वी चालवल्यानंतर त्यांनी आणखी एक कारखाना चालवायला घेतला, त्या कारखान्याचे गाळपदेखील यशस्वी केलं आहे.

याउलट पंकजा मुंडे (Pankaja Munde) अध्यक्ष असलेला वैद्यनाथ साखर कारखाना (Vaidyanath Sugar Factory) कर्जाच्या ओझ्याखाली असून त्याचे गाळपही बंद आहे. तसेच शेतकऱ्यांच्या उसाचे, मुकादमांचे आणि कर्मचाऱ्यांचे पगार देणं बाकी आहेत. तर, धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी चालवायला घेतलेल्या कारखान्यानेदेखील यंदा गाळप केले नाही. या कारखान्यानेही मुकादम आणि शेतकऱ्यांचे पैसे थकवले आहेत. याच मुद्द्याला बजरंग सोनवणे यांनी हात घातला आहे.

सोनवणे म्हणाले, येडेश्वरी साखर कारखान्याच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांच्या हाताला रोजगार मिळवून दिला. यामुळे तरुणवर्ग स्वतःच्या पायावर उभा राहिला. सामान्य कुटुंबाची चूल पेटविणे ही माझी लायकी आहे. तर आपल्या कारखान्याच्या परिसरात शेतकऱ्यांनी रक्ताचे पाणी करून पिकविलेल्या उसाला मराठवाड्यातील साखर कारखान्याच्या तुलनेत या शेतकऱ्याच्या मुलाने सर्वाधिक भाव दिला, हीच माझी लायकी आहे.

परंतु ज्यांना आपल्या वडिलांनी कष्टाने उभा केलेला साखर कारखाना नीट चालविता आला नाही. ज्यांनी शेतकरी व कामगारांच्या चुलीत पाणी टाकण्याचे काम केले. त्यांनी स्वतःची लायकी काय हे तपासावे असा टोला लगावत सोनवणे यांनी मुंडेंच्या टीकेला उत्तर दिलं.

(Edited By Jagdish Patil)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT