Beed Crime News : बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे रविवारी (ता. २२) दुपारी भीषण अपघात घडला. भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीवरील दाम्पत्याचा मृत्यू झाला. माजलगाव येथील गढी रोडवर हा अपघात झाला असून, या घटनेचा थरारक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. या प्रकरणी भाजप नगरसेवकाच्या अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण माजलगाव तालुक्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक
याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बीडमधील माजलगाव येथील भाजप नगरसेवक दीपक मेंडके यांचा अल्पवयीन मुलगा दक्ष मेंडके हा चारचाकी गाडी चालवत होता. शहरातील गढी रोडवरील सौभाग्य मंगल कार्यालयाजवळ असलेल्या पेट्रोल पंपासमोर त्याची कार आली असताना, समोरून येणाऱ्या गायकवाड दाम्पत्याच्या दुचाकीला कारने जोरदार धडक दिली.
या धडकेत गायकवाड दाम्पत्य हवेत उंच उडून रस्त्यावर कोसळले. या भीषण अपघातात प्रल्हाद गायकवाड (वय ५०) यांचा जागीच मृत्यू झाला. तर सुनीता गायकवाड (वय ४५) यांना उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जात असताना त्यांचा मृत्यू झाला.
अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर
या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून, त्यामध्ये कारची दुचाकीला झालेली जोरदार धडक दिसत आहे. या प्रकरणी माजलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गाड्यांच्या शर्यतीतून अपघात झाल्याची चर्चा
दरम्यान, हा अपघात भाजप नगरसेवकाच्या अल्पवयीन मुलासह त्याच्या दोन मित्रांमध्ये सुरू असलेल्या गाड्यांच्या शर्यतीतून घडल्याची चर्चा माजलगाव शहरात सुरू आहे. या दिशेनेही पोलीस तपास करत असल्याची माहिती आहे. मात्र, अपघातात एका दाम्पत्याला जीव गमवावा लागल्याने शहरातून संताप व्यक्त केला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.