Beed Mahavikas Aghadi March News  Sarkarnama
मराठवाडा

Beed March News : पवार-राऊत यांना मिळालेल्या धमकीच्या विरोधात पहिला मोर्चा बीडमध्ये..

Mahavikas Aghadi : जिल्हाधिकारी दिपा मुधोळ - मुंडे यांना निवेदन देवून दोषीविरुध्द कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

सरकारनामा ब्युरो

Marathwada : शरद पवार फक्त व्यक्ति नसून एक विचार आहे, पुरोगामी महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांचा मोठा वाटा आहे. (Beed Mahavikas Aghadi March News) पद्मविभुषण खासदार शरद पवार यांची प्रतिमा जाणीवपूर्वक मलीन करण्याचा प्रयत्न विरोधी पक्षांकडून होत आहे. काही समाजविघातक प्रवृत्तींकडून त्यांना `तुमचा दाभोळकर करू' अशा समाजमाध्यमातून धमक्या दिल्या जात आहेत. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्या बाबतही किळसवाने राजकारण करून त्यांची बदनामी केली जात आहे.

दोन्ही नेत्यांना देण्यात आलेल्या धमक्याचा निषेध करण्यासाठी (Beed News) बीड जिल्हा (Ncp) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि महाविकास आघाडीतील समविचारी पक्ष आणि संघटनांच्यावतीने सोमवारी (ता. १२) जिल्हाधिकारी कार्यालयावर मुकमोर्चा काढून निषेध नोंदविण्यात आला. दरम्यान, पवार व राऊत यांना दिलेल्या धमकीच्या निषेधार्थ राज्यात महाविकास आघाडीने एकत्र येत काढलेला हा पहिलाच मोर्चा ठरला. यात इतरही संघटनांनी सहभाग घेतला.

जिल्हाधिकारी दिपा मुधोळ - मुंडे यांना निवेदन देवून दोषीविरुध्द कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. (Mahavikas Aghadi) अलिकडच्या काळात काही समाजकंटक केवळ महाराष्ट्र अस्थिर करण्यासाठी समाजविघातक काम करत आहेत. सोशल मिडीयावर काही माथेफिरुंनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांना `तुमचा दाभोळकर करू' अशी जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

धमकी देणारा अतिरेकी प्रवृत्तीचा व्यक्ति भारतीय जनता पार्टीचा सदस्य असल्याचाही उघड झाल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी केला. दबावापोटी पोलिस दोषीविरुध्द कारवाई करण्यास धजावत नाहीत. शिवसेना नेते तथा राज्यसभा सदस्य खासदार संजय राऊत यांचीही बदनामी करून त्यांना समाज माध्यमातून धमकी देण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.

मोर्चात राष्ट्रवादीसह शिवसेना (उबाठा) काँग्रेस आय, जनता दल यांसह महाविकास आघाडीतील सर्व समविचारी पक्ष आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मुकमोर्चा निघाला. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून मोर्चात सहभाग घेतला.

राष्ट्रवादीचे माजी आमदार अमरसिंह पंडित, आमदार संदीप क्षीरसागर, बाळासाहेब आजबे, विक्रम काळे, सुशिला मोराळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. राजेश्वर चव्हाण, काँग्रेस आयचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख अनिल जगताप, रत्नाकर शिंदे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजयसिंह बांगर, माजी आमदार सय्यद सलीम, संजय दौंड, पृथ्वीराज साठे, उषा दराडे, सिराज देशमुख, सुनिल धांडे, राजेंद्र जगताप, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे आदींची उपस्थिती होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT