Mla Suresh Dhas
Mla Suresh Dhas Sarkarnama
मराठवाडा

Beed : दरोड्याच्या गुन्ह्यात आमदार धस यांना अटकपूर्व जामीन..

सरकारनामा ब्युरो

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर दरोड्याच्या आरोपावरून दाखल झालेल्या गुन्ह्यात, कोर्टाने त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. (Suresh Dhas) सुरेश धस यांच्यासह इतर ३८ जणांविरोधात आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा झाला होता. (Beed) धस व इतर काही व्यक्तींनी घराचे कंपाऊंड वॉल व बांधकाम जेसीबीच्या सहाय्याने पाडल्याचा आरोप फिर्यादी माधुरी चौधरी यांनी केला होता. (Marathwada) या प्रकरणी ८ महिन्यांपूर्वी गुन्हा दाखल झाला होता.

मात्र त्यानंतर फिर्यादीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करत दरोड्याच्या गुन्ह्यातील कलमांमध्ये वाढ करण्याची मागणी केली होती. उच्च न्यायालयाच्या आदेशानूसार धस यांच्यावर कलम ३९५ व ४५२ लावण्यात आले होते. या प्रकरणात बीड येथील सत्र न्यायालयाने सुरेश धस यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. धस यांच्यातर्फे अॅड. दिनेश हांगे यांनी काम पाहिले.

धस यांच्यासह ३८ जणांवर आठ महिन्यांपुर्वी दरोड्याचा गुन्हा दाखल करतांना पोलिसांनी धस यांना वाचवण्यासाठी जाणूनबुजून महत्वाची कलम गुन्हा दाखल करतांना वगळल्याचा आरोप फिर्यादीने केला होता. त्यानंतरही पोलिसांनी कलम न लावल्याने फिर्यादीने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. खंडपीठाने या प्रकरणात धस यांच्या विरोधात दाखल गुन्ह्यात योग्य कलम लावण्याचे आदेश पोलिसांना दिले होते.

खंडपीठाच्या आदेशानंतर पोलिसांनी आमदार सुरशे धस व अन्य ३८ जणांवर दाखल दरोड्याच्या गुन्ह्यात संबंधित कलमांचा समावेश केल्याची माहिती खंडपीठाला दिली होती. आष्टी तालु्क्यातील माधुरी चौधरी यांनी आमदार सुरेश धस व अन्य ३८ जणांविरुद्ध सुडबुद्धीने आपल्या घराची संरक्षक भिंत पाडून, गॅस कटरने साहित्य कापून नेल्याची फिर्याद पोलिसात दिली होती. यावरून आष्टी पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यात पोलिसांनी कलम १४३,१४७,१४८,१४९, ४२७,३७६ आणि ३७९ कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर मा्धुरी चौधरी यांनी पोलिसांकडे कलमांत वाढ करण्याची मागणी केली होती. खंडपीठाच्या आदेशानंतर या प्रकरणात आष्टी पोलिसांनी दरोड्याचे ३९५, बेकायदा घरात घुसणे कलम ४४८, एखाद्याला रोखून भिती दाखवणे कलम ४५३, शांतता भंग करणे व इतर ३४१, ५०४ व ५०६ या नव्या कलमांचा समावेश केला होता. या प्रकरणात अटकपुर्व जामीनासाठी धस यांनी बीड सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने तो मंजुर केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT