Bombay High Court, Bench Aurangabad
Bombay High Court, Bench Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Beed : आमदार सुरेश धस यांना खंडपीठाचा दणका ; दरोड्याच्या गुन्ह्यातील कलमांमध्ये वाढ..

सरकारनामा ब्युरो

बीड : विधान परिषदेतील भाजपचे आमदार सुरेश धस यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने चांगलाच दणका दिला. (Beed) एका प्रकरणात धस यांच्यासह ३८ जणांवर आठ महिन्यांपुर्वी दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Fir) परंतु पोलिसांनी धस यांना वाचवण्यासाठी जाणूनबुजून महत्वाची कलम गुन्हा दाखल करतांना वगळल्याचा आरोप फिर्यादीने केला होता. (Marathwada) त्यानंतरही पोलिसांनी कलम न लावल्याने फिर्यादीने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. (Suresh Dhas)

खंडपीठाने या प्रकरणात धस यांच्या विरोधात दाखल गुन्ह्यात योग्य कलम लावण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. खंडपीठाच्या आदेशानंतर पोलिसांनी आमदार सुरशे धस व अन्य ३८ जणांवर दाखल दरोड्याच्या गुन्ह्यात खंडपीठाच्या आदेशानंतर संबंधित कलमांचा समावेश केल्याची माहिती खंडपीठाला दिली आहे. या कारवाईने धस यांना चागंलाच दणका बसला आहे.

आष्टी तालु्क्यातील माधुरी चौधरी यांनी आमदार सुरेश धस व अन्य ३८ जणांविरुद्ध सुडबुद्धीने आपल्या घराची संरक्षक भिंत पाडून, गॅस कटरने साहित्य कापून नेल्याची फिर्याद पोलिसात दिली होती. यावरून आष्टी पोलिस ठाण्यात सुरेश धस व अन्य ३८ जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात पोलिसांनी कलम १४३,१४७,१४८,१४९, ४२७,३७६ आणि ३७९ कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.

त्यानंतर मा्धुरी चौधरी यांनी पोलिसांकडे कलमांत वाढ करण्याची मागणी केली होती. परंतु पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले, त्यानंतर चौधरी यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करत दाद मागितली होती. आठ महिन्यापुर्वीच्या या प्रकरणात न्यायालयाने आष्टी पोलिसांना कलमांमध्ये वाढ करण्याचे आदेश देत तसा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते.

खंडपीठाच्या आदेशानंतर या प्रकरणात आष्टी पोलिसांनी दरोड्याचे ३९५, बेकायदा घरात घुसणे कलम ४४८, एखाद्याला रोखून भिती दाखवणे कलम ४५३, शांतता भंग करणे व इतर ३४१, ५०४ व ५०६ या नव्या कलमांचा समावेश गुन्ह्यात करण्यात आल आहे. याची माहिती आष्टी पोलिसांनी खंडपीठात सादर केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT