Beed municipal elections; Deepak Deshmukh, Sharad Pawar And Walmik Karad sarkarnama
मराठवाडा

Walmik Karad : बीडमध्ये धमक्या? 'अण्णा बाहेर येतोय'; स्ट्राँग रुमला पहारा देणारा शरद पवारांचा उमेदवारच रडारवर

Beed municipal elections : बीडसह नगरपालिका निवडणुकीचा निकाल लांबणीवर पडले आहेत. अशावेळी मतपेट्या ठेवलेल्या स्ट्राँग रुमजवळ महाविकास आघाडीचे पदाधिकारी खडा पहारा देताना दिसत आहेत.

Aslam Shanedivan

  1. नगरपरिषदेच्या निकालाआधीच बीडमध्ये धमक्यांचे सत्र सुरू झाले असून एका व्हायरल ऑडिओमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

  2. बाजीराव धर्माधिकारी यांनी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार दीपक देशमुख ‘वाल्मिक कराडच्या रडारवर’ असल्याचे बोलल्याचे ऐकू येते.

  3. या क्लिपनंतर राष्ट्रवादी (अजित पवार) व काँग्रेस (शरद पवार) गटात तणाव चिघळला आहे.

Beed news : राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या असून आता निकाल 21 डिसेंबरला लागणार आहे. सध्या मतपेट्या स्ट्राँग रुममध्ये मोठ्या पोलिस बंदोबस्तात ठेवण्यात आल्या आहेत. मात्र महायुतीचे काही खरे नाही असे म्हणत महाविकास आघाडीचे पदाधिकारी खडा पहारा देताना दिसत आहेत. असाच पहारा बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला असून दोन दिवसांपूर्वी केलेल्या आंदोलनामुळे देशमुख यांच्यासह 25 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण आता यापेक्षा धक्कादायक बाब म्हणजे अण्णा लवकरच बाहेर येत असून दीपक देशमुख साहेबांच्या रडारवर आहेत, त्यामुळे माझ्यासोबत राहा अशी, धमकीची ऑडिओ क्लिपमध्ये व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लिपनंतर मोठी खळबळ उडाली आहे.

बीड नगरपालिकेच्या नगराध्यक्ष व 51 नगरसेवकांच्या निवडीसाठी मंगळवारी (2 डिसेंबर)मतदान झाले असून एका जागेची 20 डिसेंबरला निवडणूक होणार आहे. तर नगराध्यक्ष व 51 नगरसेवकांच्या भवितव्याचा निकाल 21 डिसेंबरला मतमोजणी नंतर स्पष्ट होणार आहे. यादरम्यान येथे धमक्यांच सत्र सुरू झाले असून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार दीपक देशमुख तशा धमक्या दिल्या जात आहेत.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पद्मश्री धर्माधिकारी यांचे पती माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांच्याकडून या धमक्या दिल्या जात आहेत. त्यांच्याकडून कार्यकर्त्याजवळ वाल्मिक कराडच्या रडारवर दीपक देशमुख असल्याचे बोलले जात आहे. तर आता याच चर्चेची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने बीडसह राज्यात खळबळ उडाली आहे.

यानंतर देशमुख यांनी पत्रकार परिषद घेत माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी आणि सुनील मस्के यांच्यात झालेल्या संभाषणाची क्लिप ऐकवत त्यांच्या जीवाला धोका असल्याचा दावा केला आहे. ज्यात तुम्ही देशमुख यांच्यासोबत राहू नका, अण्णा लवकरच बाहेर येत असून देशमुखच साहेबांच्या रडारवर आहेत. त्यामुळे तुम्ही त्यांच्यासोबत नको तर माझ्यासोबत राहा अशी यात चर्चा आहे.

यानंतर आता देशमुख यांनी परळीतील प्रशासन कोणाच्यातरी दबावाखाली काम करत असल्याचा आरोप केला असून आपल्या जीवाला धोका असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. तसेच त्यांनी आमच्या जीवाला धोका असून बाजीराव धर्माधिकारी यांचा सीडीआर तपासावा अशी मागणी केली आहे.

तसेच स्ट्राँग रूम बाहेर थाबल्यावरून दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यावरून त्यांनी, आम्ही स्ट्राँग रूम बाहेर थांबण्यासाठी रीतसर परवानगी मागितली होती, परंतु ती दिली गेली नाही. पण थांबलेलो असताना पोलिसांनी हाकलून लावलं. या प्रकरणाबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्याचेही माहिती देशमुख यांनी दिली आहे.

FAQs :

1. प्रश्न: व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये काय ऐकू येते?
उत्तर: बाजीराव धर्माधिकारी हे दीपक देशमुख हे ‘वाल्मिक कराडच्या रडारवर’ असल्याचे बोलताना ऐकू येतात.

2. प्रश्न: हा वाद कोणत्या गटांमध्ये सुरू आहे?
उत्तर: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि काँग्रेस शरद पवार गट यांच्यात तणाव वाढला आहे.

3. प्रश्न: ऑडिओ क्लिप कधी समोर आली?
उत्तर: नगरपरिषदेच्या निकालाआधीच क्लिप व्हायरल झाली.

4. प्रश्न: या प्रकरणाचा निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकतो?
उत्तर: तणाव वाढल्याने राजकीय वातावरण आणखी तापेल आणि मतदारांवरही परिणाम होऊ शकतो.

5. प्रश्न: अधिकृत तक्रार दाखल झाली आहे का?
उत्तर: क्लिप व्हायरल झाल्याने तक्रार होण्याची शक्यता आहे; अद्याप अधिकृत माहिती उपलब्ध नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT