Beed Politics : केज तालुक्यातील नांदूरघाटच्या सरपंच सुनिता युवराज जाधव यांना मनरेगा रस्ते कामांतील १ कोटी ३ लाख ८९ हजार ४८० रुपयांच्या अपहारप्रकरणी विभागीय आयुक्तांनी सरपंच पदावरून अपात्र घोषित केले आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम ३९ (१) नुसार हा कठोर निर्णय घेण्यात आला असून, अपहाराची रक्कम व्याजासह वसूल करून दोषींवर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
ग्रामरोजगार सेवक शेख सादिक दिलावर यांच्या तक्रारीनंतर झालेल्या चौकशीत मनरेगांतर्गत २६ पैकी ८ रस्त्यांवर प्रत्यक्ष काम न करताच ५९ लाख ४६ हजार ४१३ रुपयांचा निधी लाटल्याचे उघड झाले. तसेच १२ रस्त्यांच्या खर्चात ४४ लाख ४३ हजार ६७ रुपयांची तफावत आढळली. कारवाईच्या भीतीने सरपंचांनी ३३ लाख १५ हजार १४७ रुपये ग्रामपंचायत खात्यात जमा केले असले, तरी हा भरणा अपहार मान्य करत असल्याचे स्पष्ट करतो, असा निष्कर्ष आयुक्तांनी नोंदवला.
याप्रकरणी तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी बी. वाय. सिरसाट आणि शाखा अभियंता व्ही. एम. सासवडे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच ग्रामरोजगार सेवक शेख सादिक दिलावर, तांत्रिक अधिकारी रविंद्र दराडे व महादेव सातपुते यांच्यावरील कारवाई पूर्ण करून केज पोलीस ठाण्यात यापूर्वीच दाखल असलेल्या गुन्ह्यान्वये संबंधितांवर फौजदारी कारवाईचे बडगा उगारण्यात आला आहे.
ग्रामपंचायत स्तरावर सार्वजनिक निधीचा अपहार करणाऱ्या सरपंचांविरोधात विभागीय आयुक्तांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. बीडच्या धारूर तालुक्यातील वाघोलीनंतर केज तालुक्यातील नांदूरघाट ग्रामपंचायतीच्या सरपंच सुनिता युवराज जाधव यांना तडकाफडकी अपात्र ठरवण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
मनरेगा अंतर्गत रस्त्यांच्या कामात तब्बल एक कोटी तीन लाख रूपयांहून अधिक रकमेचा अपहार आणि कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी अंतिम निर्णय देत अपहाराची रक्कम व्याजासह वसूल करण्यासह दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.