Guardian Minister Dhnanjay Munde
Guardian Minister Dhnanjay Munde Sarkarnama
मराठवाडा

Beed : राष्ट्रवादी `घड्याळ`, घेऊन आपल्या दारी..

सरकारनामा ब्युरो

बीड : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या परळी मतदारसंघात राष्ट्रवादी आपल्या दारी हा उपक्रम सुरू केला आहे. (Beed) मतदारसंघात पक्षाची ताकद अधिक वाढवणे, सर्व सामान्यांच्या समस्या जाणून घेत त्या सोडवणे आणि राष्ट्रवादी सदस्य नोंदणी असे या उपक्रमाचे स्वरुप आहे. परळी शहरातून आजपासून या उपक्रमाला सुरूवात झाली. यावेळी धनंजय मुंडे (Dhnanjay Munde) यांच्याकडून प्रत्येकाला भिंतीवरील घड्याळ भेट म्हणून देण्यात आले.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि धनंजय मुंडे यांचा फोटो असलेले हे घड्याळ आता परळीतील प्रत्येक घरात दिसणार आहे. (Ncp) गेल्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी आपल्या बहिणीचा पराभव करत विजय मिळवला होता. परळीकरांनी २० हजारांच्या मताधिक्याने त्यांना निवडून दिले होते. (Marathwada) याबद्दल मतदारांचे आभार देखील मुंडे यांनी या निमित्ताने मानले.

परळी शहरातून सुरु झालेल्या राष्ट्रवादी आपल्या दारी या मोहिमे दरम्यान, अनेकांना सदस्यत्वाचे अर्ज देखील देण्यात आले. परळीकरांनी मला मोठ्या मताधिक्याने विधानसभेत पाठवले, मी कायम त्यांच्या ऋणात राहू इच्छितो, अशी प्रतिक्रिया मुंडे यांनी यावेळी व्यक्त केली. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. येत्या तीन-चार महिन्यात महापालिका, जिल्हा परिषदांसह अनेक स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होत आहेत.

या निमित्ताने धनंजय मुंडेकडून राबवण्यात येणार्या राष्ट्रवादी आपल्या दारी या मोहिमेची चांगलीच चर्चा होतांना दिसते आहे. या मोहिमे अंतर्गत परळी शहरातील घराघरात जाऊन धनंजय मुंडे नागरिकांच्या भेटी घेत आहेत. ठिकठिकाणी त्यांचे औक्षण करून स्वागत केले जात आहे. मुंडे या स्वागताचा स्वीकार करतांना प्रत्येक घरात घड्याळ भेट देत आहेत. शरद पवार आणि स्वःताचा फोटो असलेल्या या घड्याळींचे वाटप सुरू असल्याने या मोहिमेची चर्चा मतदारसंघात सुरू आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT