Marathwada : राज्यात पुन्हा एकदा मोठी राजकीय उलथापाथल झाली आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. (Beed Ncp News) मात्र, बीडचे राष्ट्रवादीचे आमदा संदीप क्षीरसागर यांनी पुन्हा एकदा जेष्ठ नेते व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत राहणार असल्याचे जाहीर केले.
आपल्या फेसबुक पेजवर `सदैव साहेबांसोबत` अशी पोस्ट संदीप क्षीरसागर यांनी केली आहे. पहाटेच्या शपथविधीनंतरही संदीप क्षीरसागर (Sandip Kshirsagar) यांनी शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेत येत आपण सोबत असल्याचे सांगीतले होते. तेव्हाची त्यांची भूमिका त्यांना शरद पवार (Sharad Pawar) यांच्या जवळ जाण्यात व यश संपादन करण्यात मोलाची ठरली होती.
पुढे महाविकास आघाडीच्या सत्तेत काही काळ त्यांचे व तत्कालिन पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. (Beed News) पुढे माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या मध्यस्थीने दोघांमधील राजकीय दुरावा काहीसा कमी झाला होता.
दरम्यान, मध्यंतरी शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्षपद सोडण्याच्या निर्णयावेळी सुरु असलेल्या बैठकीदरम्यान संदीप क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांच्या फोनवरुन शरद पवार यांना संपर्क साधण्याच्या प्रयत्नावर अजित पवार यांची नाराजी थेट माध्यमांवरुन दिसली होती.
एकूणच संदीप क्षीरसागर सुरुवातीपासून शरद पवार व खासदार सुप्रिया सुळेंच्या निकट तर अजित पवारांच्या विरोधी गटातील मानले जात होते. विधानसभा निवडणुकीतही शरद पवारांनी त्यांच्यावर मोठा विश्वास टाकत उमेदवारी दिली आणि हा विश्वास सार्थ ठरवत संदीप क्षीरसागर विजयी झाले होते. आताही त्यांनी शरद पवार यांचीच साथ देण्याचा निर्णय घेतला.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.