Marathwada News : खाकीचा धाक हा समाजातील गुंड, गुन्हेगार, अपप्रवृत्तीवर असायलाच हवा. पण जेव्हा याचा खाकी वर्दीच्या आड काही पोलीस सर्वसामान्यांना छळतात तेव्हा कधी ना कधी त्यांच्या पापाचा घडा भरतोच. एका शेतात पवनचक्कीचे काम करतांना झालेल्या वादावादी दरम्यान तिथे उपस्थित नेकनूर पोलीस स्टेशनचा अंमलदार दत्तात्र्य बळवंत याने संबंधित 'शेतकऱ्याला तुझे कॅरेक्टर खराब करून टाकीन' अशी जाहीर धमकी दिली होती.
योगायोग म्हणा, की नशिबाचा फेरा याच अंमलदार दत्तात्र्य बळवंत यालाना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने दहा हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले. शेतकऱ्याचे कॅरेक्टर खराब करण्याची धमकी देणाऱ्या या पोलीस कर्मचाऱ्याचेच या लाच प्रकरणामुळे आता कॅरेक्टर खराब झाले आहे. अपघातामध्ये मयत झालेल्या वडिलांच्या विम्याच्या दाव्यासाठी कागदपत्र देण्यासाठी बळवंत याने पंधरा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
तडजोडीनंतर दहा हजार रुपये स्वीकारताना या पोलीस अंमलदाराला रंगेहात पकडण्यात आले आहे. बीडच्या नेकनुर पोलीस स्टेशनमध्ये अंमलदार असलेल्या दत्तात्रय बळवंत याला जालना अँटी करप्शनच्या पथकाने पकडले आहे. याच वादग्रस्त दत्तात्रय बळवंत याने एका शेतकऱ्याच्या मुलाला 'तुझे कॅरेक्टर खराब करून टाकीन' अशी धमकी काही दिवसापूर्वी दिली होती.
या घटनेचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमावर व्हायरल होत आहे. एका अपघातात तक्रारदाराचे वडील मयत आहेत. त्यांचा विम्याचा दावा कोर्टात करण्यासाठी पोलीस स्टेशनकडून दिले जाणारे कागदपत्र मिळावे यासाठी तक्रारदाराने वारंवार मागणी केली.
यावेळी कागदपत्र देण्यासाठी पंधरा हजाराची मागणी केली होती. दहा हजार देण्याचे ठरले. दहा हजार रुपयांची लाच आज स्वीकारताना बळवंत याला रंगेहात पकडण्यात आले. या कारवाईनंतर आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.