Gram Panchayt Election News, Beed Sarkarnama
मराठवाडा

Beed News : निवडणूक जबाबदारीत हलगर्जीपणा ; सहा कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल..

Gram Panchayt : तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी दत्ता भारस्कर यांच्या आदेशानंतर संबंधित कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरकारनामा ब्युरो

Gram Panchayt Election : बीड जिल्ह्यातील ७०४ ग्रामंपचायतींसाठी आज मतदान सुरू झाले. दरम्यान, वडवणी येथे निवडणुकीची जबाबदारी दिलेली असतांना त्यात हलगर्जी केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Beed वडवणी तालुक्याचे तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी दत्ता भारस्कर यांच्या आदेशानंतर संबंधित कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून कर्मचाऱ्यांना जबाबदारी देण्यात आली आहे. वडवणी तालुक्यात निवडणूक कामकाजासाठी शिक्षकांसह इतर कर्मचाऱ्यांना जबाबदारी देण्यात आली आहे. यामध्ये मतदान अधिकारी, केंद्राध्यक्ष अशा विविध जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या.

असे असतांना वडवणी येथे कर्तव्य बजावण्यास सांगण्यात आलेल्या शिक्षकांसह इतर विभागातील सहा कर्मचाऱ्यांनी त्यात हलगर्जीपणा केल्याचे निदर्शनास आले. (Gram Panchayt Election) मतदान अधिकारी, केंद्राध्यक्ष म्हणून दिलेली जबाबदारी पार न पाडल्याचा ठपका ठेवत तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी दत्ता भारस्कर यांनी सहा कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. (Fir Filed)

रविंद्र धर्मराज गायकवाड, महारुद्र ललितराव बादाडे, शाहूराव पांडुरंग जायभाये, दिलीप देवजी माऊची, सुवर्ण सखाराम आयचित, व्ही. एस. डाके अशी गुन्हा दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. जिल्ह्यात मतदान सुरळीत सुरू असतांना प्रशासनाकडून झालेल्या या कारवाईने एकच खळबळ उडाली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT