Manoj Jarange Patil Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Patil : जरांगे-पाटलांनी नारायणगडावरून थोपटले दंड; म्हणाले, “न्याय मिळाला नाही, तर...”

Manoj Jarange Patil's Beed Narayangad Dasara Melava : "मराठ्यांना जात कधी शिवली नाही. मराठे साथ दिली तर साथ देतात नाहीतर ते धडा शिकवतात. या नारायण गडाने जातीवाद न करण्याची शिकवण दिली आहे. या गडाने अनेकांना आशीर्वाद दिलेत. आशीर्वाद दिला त्यांनी दिल्ली देखील वाकवली पण..."

Jagdish Patil

Beed News, 12 Oct : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पहिल्यांदाच नारायण गडावर भव्य असा दसरा मेळावा घेत मोठं शक्तीप्रदर्शन केलं आहे. या मेळाव्याला राज्यभरातून हजारो मराठा बांधव उपस्थित राहिले आहेत.

या मेळाव्यात बोलताना जरांगे पाटील यांनी जमलेल्या मराठा बांधवांचे आभार मानले. तसंच यावेळी त्यांनी पुन्हा एकदा सरकारला उलथापालथ करण्याचा इशारा दिला.

जरांगे (Manoj Jarange Patil) म्हणाले, "एवढ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित राहिलं असं वाटलं नव्हतं. या जनसमुदायावर संस्कार आहेत ते संस्कार कधीच जातीवाद करत नाहीत. प्रचंड ताकदीने असणारा हा समाज समुद्रासारखा पसरला आहे. पण तो कधीच मस्तीत वागला नाही. प्रत्येकाला सांभाळण्याचं साथ देण्याचं काम या समाजाने केला आहे.

मराठ्यांना जात कधी शिवली नाही. शिवाय मराठे (Maratha) साथ दिली तर साथ देतात नाहीतर ते धडा शिकवतात. या नारायण गडाने जातीवाद न करण्याची शिकवण दिली, अनेकांना आशीर्वाद दिले. शिवाय ज्यांना आशीर्वाद दिला त्यांनी दिल्ली देखील वाकवली पण उलटले म्हणून त्यांना पुन्हा उलटे केले.

या राज्यात अन्याविरुद्ध एक लाट आल्यामुळे आता उठाव झाला. दसरा आणि विजयादशमी म्हणजे अन्यायाच्या विरुद्ध लढून विजयाकडे जाण्याचा मार्ग. देवा धर्मानं सुद्धा अन्यायाच्या विरोधात उठावं केला आहे.

न्याय नाही मिळाला तर आपल्याला उलथापालथ करावीच लागणार

राज्यातला मराठा असो, सामान्य ओबीसी असो किंवा शेतकरी आपल्याला टार्गेट केलं जात आहे. आता तरी सावध व्हा. यांना कळून चुकलं असेल की यांना टार्गेट केलं की काय होतं. पण आपल्याला न्याय नाही मिळाला तर उलथापालथ करावीच लागणार आहे. त्याशिवाय पर्याय नाही", असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला ललकारलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT