Dhananjay Munde News Sarkarnama
मराठवाडा

Dhananjay Munde News : ...तोपर्यंत मी फेटा बांधणार नाही; धनंजय मुंडेंचा निर्धार, अतिवृष्टीचे अनुदान मिळवून देणार

Beed Politics : कितीही संकटं आली तरी अतिवृष्टीचे पैसे मी मिळवून देणार...

Mangesh Mahale

Beed : "जोपर्यंत शेतकऱ्यांना पीकविमा आणि अतिवृष्टीचे अनुदान मिळत नाही, तोपर्यंत मी हार-तुरे अन् फेटे बांधून घेणार नाही," असा निर्धार कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केला आहे. "राज्यातील एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही, याची जबाबदारीही राज्याचा कृषिमंत्री म्हणून माझ्यावर आहे," असे मुंडे म्हणाले. परळी मतदारसंघातील सिरसाळा येथे कृतज्ञता सोहळ्यात ते बोलत होते.

"दिवाळीच्या आत कितीही संकटं आली तरी अतिवृष्टीचे पैसे मी मिळवून देणार," असा शब्द मुंडेंनी दिला. "परळी येथील सोयाबीनचे उपकेंद्र सुरू होणार हे कोणी स्वप्नात ही पाहिलं नसेल, सोयाबीनचे उपकेंद्र परळी तालुक्यात आणले अन् लातूरच्या लोकांनी माझ्या पोस्टरला चपलांचा हार घातला अन् तुम्ही साधा या घटनेचा निषेधदेखील केला नाही, माझी आई खूप आजारी आहे म्हणून लातूरहून विमानाने तिला मुंबईला घेऊन जात असताना तिथल्या लोकांनी आम्हाला काळे झेंडे दाखवले," अशी खंत मुंडेंनी व्यक्त केली.

"जात हा माझ्या राजकारणाचा विषय राहणार नाही. ज्या दिवशी मी जात काढेल त्या दिवशी मी राजकारण सोडून घरी बसेल. कोणत्या जातीत जन्माला यावं हे ईश्वराच्या हातात आहे. त्याच्याकडे अर्ज करता येत नाही, १९९८ पासून मी मराठा आरक्षणासाठी लढा दिला आहे. बीड जिल्हा परिषदेत पहिल्यांदा 2007 मध्ये मराठा आरक्षणाचा ठराव घेतला. विधिमंडळाच्या सभागृहात सर्वात जास्त मराठा आरक्षणाची भाषणं मी केली आहे. मुस्लिम बांधवांसाठी, धनगर समाजासाठी अन् मराठा समजासाठी आरक्षण मिळावे ही माझी भूमिका आहे, असे मुंडे म्हणाले.

"मराठा आरक्षणावर मुंडे म्हणाले, "आरक्षण देताना ते सर्वोच्च न्यायालयात टिकलं पाहिजे आणि संविधानाप्रमाणे असावं. ही सरकारची जबाबदारी आहे. येणाऱ्या काळात राज्यात ज्या पद्धतीने राजकारण सुरू आहे, त्याला आपण बळी पडता कामा नये," असा सल्ला त्यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT