Laxman Pawar Sarkarnama
मराठवाडा

Laxman Pawar: निवडणुकीपूर्वीच भाजप आमदाराचा धक्कादायक निर्णय; फेसबूक पोस्ट करीत दिली माहिती...

Mangesh Mahale

Beed : विधानसभा निवडणुकीपूर्वीच भाजपच्या विद्यमान आमदाराने फेसबूक पोस्ट करीत आमदारकीची निवडणुक लढविणार नसल्याचे जाहीर केले आहे. एका स्थानिक वृत्तपत्राला त्यांनी मुलाखत दिली असून त्या बातमीचे कात्रण त्यांनी फेसबूकवर शेअर केल्यानंतर बीड जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

"मी आणि माझ्या कुटुंबातील कोणीच आमदारकीची निवडणूक लढविणार नाही," असे बीडच्या गेवराई मतदार संघाचे भाजपचे विद्यमान आमदार लक्ष्मण पवार यांनी म्हटलं आहे. यामुळे गेवराई मतदार संघातील त्यांच्या कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसल्याची चर्चा आहे.

आमदार लक्ष्मण पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन नॉट रिचेबल आहे. आमदार लक्ष्मण पवार यांनी निवडणूक न लढण्याची निर्णय खरंच घेतला आहे का? हे त्यांच्याशी संपर्क झाल्यानंतरच समजेल. पण छापून आलेल्या बातमीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे, हे मात्र नक्की.

तक्रारी करण्याचा माझा स्वभाव नाही..

सध्याच्या राजकारणाला मी कंटाळलो आहे. मी जर जनतेची कामे करू शकत नसेल तर माझ्या पदाचा उपयोग काय ? माझे गाऱ्हाणे मी पक्षश्रेष्ठीपुढे मांडले आहे, एक गोष्ट मी एकदाच सांगतो, वारंवार तक्रारी करण्याचा माझा स्वभाव नाही.. पण तरीही सुधारणा होत नसतील तर आम्ही स्वाभिमानी आहोत, अशा शब्दात त्यांनी आपली व्यथा व्यक्त केली आहे

पालकमंत्री ऐकत नाहीत

एक चांगला तहसीलदार, चांगला पोलिस अधिकारी, चांगला गटविकास अधिकारी एवढेच मागितलं होतं. मात्र तेही मिळालं नाही,पालकमंत्री ऐकत नाहीत, त्यामुळे राजकारण करायचं तरी कशाला ? कार्य करू चळवळीत राहू, मी पक्ष सोडणार नाही, पण आमच्या घरातील कोणीच निवडणूक लढवणार नाही.. अशी प्रतिक्रिया त्यांनी वृत्तपत्रात दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT