Joyati Mete News, Beed Sarkarnama
मराठवाडा

Beed News : डॉ. ज्योती कोड्यात बोलल्या, पण सांगून गेल्या मेटेंचे स्वप्न..

Jyoti Mete News: देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती आम्हा सर्वांना नवीन उर्जा व बळ देणारी, उमेद वाढविणारी ठरेल.

सरकारनामा ब्युरो

Marathwada political News: आपण प्रशासकीय पदावर कार्यरत आहोत, आपण कायमच चौकटीत राहून काम केलेले असून भविष्यात देखील चौकटीत राहूनच काम करु. दिवंगत (Vinayak Mete) विनायक मेटेंचे स्वप्न पुढे नेऊ व वेळेनुरुप भूमिका घेऊ, असे कोड्यात उत्तर देत भविष्यात राजकारणातही उतरु शकतो हे डॉ. ज्योती मेटे यांनी सांगून टाकले.

शनिवारी (ता. ३१) अण्णासाहेब पाटील प्रतिष्ठानच्या वतीने व्यसनमुक्ती जनजागृती फेरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होत आहे. (Beed News) यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री अतुल सावे आदींची उपस्थिती असेल. (Marathwada) याची माहिती देण्यासाठी गुरुवारी (ता. २९) डॉ. ज्योती मेटे यांनी पत्रकार परिषद घेतली.

ज्योती मेटे म्हणाल्या, दिवंगत लोकनेते विनायक मेटे यांनी कायम व्यसनमुक्तीसाठी पुढाकार घेतला. दरवर्षी ३१ डिसेंबरला व्यसनमुक्तीच्या प्रचारासाठी भव्य जनजागृती फेरी व संगीत रजनीचे कार्यक्रम होत. त्यांच्या पश्चात ही चळवळ पुढे सुरु ठेवत यंदाही शनिवारी शहरात सकाळी जनजागृती फेरी व सायंकाळी स्वर सुमनांजली कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती आम्हा सर्वांना नवीन उर्जा व बळ देणारी, उमेद वाढविणारी ठरेल.

आपण आज दिवंगत मेटेंची व्यवसमुक्तीची चळवळ पुढे नेत आहात पण दिवंगत मेटे यांनी कायम सामाजिक चळवळीला राजकीय बळ दिले. अनेक प्रश्न त्यांनी राजकीय व्यासपीठावरुन मांडले व सोडवणूक केले. आपण त्यांचे अधुरे स्वप्न पुर्णत्वासाठी वेगळी भूमिका घेणार का?

या प्रश्नावर त्या म्हणाल्या, दिवंगत मेटे यांचे राज्यभरात विस्तारीत कुटूंब असून ते एकसंघ आहे. तयांच्या पश्चात आपण आपल्या प्रशासकीय चौकटीत राहून प्रत्येकाच्या सुख-दु:खात सहभागी होत आहोत. आज प्रशासकीय चौकटीत काम करत असूनन भविष्यात देखील कालानुरुप व चौकटीत राहून निर्णय घेऊ असेही त्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT