Bjp Leader Pankaja Munde News, Beed Sarkarnama
मराठवाडा

Beed : काय हायवे, काय हाॅटेल, सगळं कसं ओक्के ; राष्ट्रीय महामार्गांच्या कामावर पंकजा मुंडे खूष..

अशीच प्रगती मला ऊसतोड कामगार, मुकादमांच्या आयुष्याची झालेली पहायची आहे. त्यासाठीच माझे जीवन मी समर्पित केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (Pankaja Munde)

सरकारनामा ब्युरो

बीड : नॅशनल हायवेमुळे इथल्या रस्त्यांचा चेहरामोहरा बदलला आहे, ही प्रगती आहे की नाही? त्यामुळे म्हणावसं वाटतं ` काय हायवे, काय डोंगर, काय हाॅटेल सगळं ओक्के`, अशा शब्दात भाजपच्या राष्ट्रीय सचिव पकंजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विभागाकडून केल्या जात असलेल्या राष्ट्रीय महामार्गांचे कौतुक केले.

अशीच प्रगती माझ्या ऊसतोड कामगार आणि मुकादमांच्या आयुष्यात देखील होवो, हीच आपली इच्छा आहे. (Beed) त्यासाठी माझे आयुष्य समर्पित असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या. मांजरसुंबा येथे झालेल्या ऊसतोड कामगार व मुकादमांच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या. (Marathwada)

भाषणात त्यांनी जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गांमुळे बदललेल्या परिस्थिती आणि प्रगतीचा आवर्जून उल्लेख केला. तो करत असतांना शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या गाजलेल्या काय ती झाडी, काय ते डोंगार याची आठवण देखील पंकजा यांना झाली.

काय ते हायवे, काय ते हाॅटेल असे म्हणताच उपस्थितांनी त्यांना दाद दिली. तुम्हाला काय आठवले असे विचारत त्यांनी पुन्हा ` काय ते हायवे, काय ते डोंगर आणि काय ते हाॅटेल सगळं कसं ओक्के` म्हणत राष्ट्रीय महामार्गांच्या कामाचे कौतुक केले.

पंकजा मुंडे म्हणाल्या, राष्ट्रीय महामार्गांच्या कामामुळे इथल्या रस्त्यांची प्रगती झाली, इथला चेहरामोहराच बदलला. अशीच प्रगती मला ऊसतोड कामगार, मुकादमांच्या आयुष्याची झालेली पहायची आहे. त्यासाठीच माझे जीवन मी समर्पित केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित स्वच्छता पंधरवाडामध्ये सहभागी होत पंकजा मुंडे यांनी स्वतः हातात झाडू घेत जिल्ह्यातील व शहरातील सर्वधर्मीय प्रार्थना स्थळांची स्वच्छता केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT