sandeep kshirsagar balasaheb ajabe  sarkarnama
मराठवाडा

Beed Politics : बीड जिल्ह्यात दोन आमदारांचे टेन्शन वाढले, उमेदवारीबाबत सस्पेंस

Assembly Election NCP Sharad Pawar Ajit Pawar : शिवसंग्रामच्या अध्यक्ष डॉ. ज्योती मेटे, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील प्रवेशाने स्पर्धा वाढली आहे.

Datta Deshmukh

Beed Politics : जिल्ह्यातील सहा आमदारांपैकी लक्ष्मण पवार यांनी अगोदरच भाजपला नकार कळविला आहे. उर्वरित धनंजय मुंडे, प्रकाश सोळंके व नमिता मुंदडा यांच्या उमेदवाऱ्या जाहीर झाल्या. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसचे आष्टीचे आमदार बाळासाहेब आजबे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर अद्यापही उमेदवारींसाठी वेटींगवरच आहेत.

सर्वप्रथम महायुतीकडून केजमधून भाजपच्या आमदार नमिता मुंदडा यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसने पालकमंत्री धनंजय मुंडे यांना परळीतून तर प्रकाश सोळंके यांना माजलगावमधून उमेदवारी जाहीर केली.

गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार यांनी भाजप सोडले आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीचा प्रश्‍न नाही. संदीप क्षीरसागर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आणि जिल्हाध्यक्षही आहेत. पक्षाने जिल्ह्यातील आष्टीतून युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, केजमधून माजी आमदार पृथवीराज साठे यांच्या नावांची गुरुवारीच (ता.24) घोषणा केली. परंतु, संदीप क्षीरसागर वेटींगवरच आहेत.

पक्षातील एका गटाकडून त्यांच्या उमेदवारीला विरोध असल्याची चर्चा आणि त्यातच शिवसंग्रामच्या अध्यक्ष डॉ. ज्योती मेटे व भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील प्रवेशाने स्पर्धा वाढली आहे. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रवेशाच्या चर्चांनाही उधाण आले आहे. त्यामुळे आणखीच सस्पेन्स वाढला आहे. दरम्यान, आष्टीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाळासाहेब आजबे देखील उमेदवारीसाठी वेटींगवरच आहे.

आष्टीचा पेच कायम

गेवराईची भाजपची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयसिंह पंडित यांना सोडून आष्टीची जागा भाजपच्या सुरेश धस यांना सोडण्याबाबत सुरुवातीपासून चर्चा आहेत. त्यातच लक्ष्मण पवारांनी भाजप सोडल्याने गेवराईतून पंडित यांचा उमेदवारीचा मार्ग सुकर झाला असला तरी आष्टीचा पेच कायमच आहे. आष्टीच्या जागेवरील दावा सोडायला राष्ट्रवादी काँग्रेस तयार नसल्याची माहिती आहे. मात्र, यावर अद्यापही शिक्कामोर्तब नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT