Beed MLA Sandeep Kshirsagar speaking to media after meeting Ajit Pawar, sparking discussions on possible unity between both NCP factions ahead of local body elections. Sarkarnama
मराठवाडा

Sandip kshirsagar News: संदीप क्षीरसागर अखेर मनातलं बोलले; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर ताकद वाढेल!

Beed Political News : अजित पवारांच्या भेटीनंतर आमदार संदीप क्षीरसागर यांनी स्पष्ट भूमिका मांडत, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास बीड जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षाची ताकद निश्चित वाढेल, असे मत व्यक्त केले.

Jagdish Pansare

Beed Political News : अजित पवार यांच्या बीड दौऱ्याची चर्चा अजूनही सुरू आहे. विकासकामांचे लोकार्पण, उद्घाटन, भुमीपूजन करतांनाच अजितदादांनी बीडच्या राजकारणात अनेक डाव टाकले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांना आपल्या हेलीकाॅप्टरमधून दिलेली लिफ्ट आणि काल बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांची पुण्यात झालेली भेट या दोन घटनांमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

बीड जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या या घडामोडी महत्वाच्या मानल्या जात आहेत. पुण्यात अजित पवारांची भेट घेतल्यानंतर आमदार संदीप क्षीरसागर अखेल मनातंल बोलूनच गेले. पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत अजित पवारांची आणि शरद पवार यांची अशा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या आहेत. बीड जिल्हा परिषदेत असाच प्रयोग होईल का? असा प्रश्न क्षीरसागर यांना विचारण्यात आला.

यावर त्यांनी आम्ही नेहमीच दोन्ही पवारांना मानत आलो आहोत. त्यामुळे हे दोन पक्ष एकत्र येतील की नाही? यावर बोलण्या इतका मी मोठा नाही. पण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर निश्चितच जिल्हा परिषद निवडणुकीत आमची ताकद वाढेल, असे क्षीरसागर म्हणाले.

बीडच्या कार्यक्रमात अजित पवारांनी शहराला दोन दिवसाआड पाणी देण्यासंदर्भात आश्वासन दिले. त्याच विषयासंदर्भातील काही तांत्रिक बाबी त्यांच्या कानावर घालण्यासाठी मी ते पुण्यात आहेत म्हणून वेळ मागितली होती. भेटायला वेळ मिळाल्याने मी त्यांना भेटलो आणि पाण्याच्या विषयावरच त्यांच्याशी बोललो, असे संदीप क्षीरसागर यांनी स्पष्ट केले.

नुकत्याच झालेल्या बीड नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष आणि सर्वाधिक नगरसेवकांसह सत्ता आली. आमदार संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानेही चांगले यश मिळवले. जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी राष्ट्रवादी पक्षाने सुरू केली आहे. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे, आमदार संदीप क्षीरसागर यांची अजित पवारांशी वाढती जवळीकता भविष्यात दोन्ही पक्ष एकत्र येण्यात होणार का? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT