Jaydatta Kshirsagar sarkarnama
मराठवाडा

जयदत्त क्षीरसागरांचा राष्ट्रवादीवरील राग जाईना... भाजपला केली मदत!

Beed Politics : राष्ट्रवादीच्या महेबूब शेख यांना जयदत्ता क्षीरसागर आणि सुरेश धस यांच्याकडून कात्रजचा घाट

सरकारनामा ब्यूरो

बीड : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार असले तरी बीड जिल्ह्यात (Mahavikas Aghadi is always in trouble in Beed District) या तीन पक्षांचे कधीच जमत नाही. आता नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष निवडीवरुन राष्ट्रवादी - शिवसेनेत जुंपली आहे.

राज्यात वरिल तीन पक्षांचे सरकार स्थापन होताच बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपद व सभापतींच्या निवडीवेळी राष्ट्रवादीने शिवसेना व काँग्रेसला झटका दिला. आता शिरुर कासार नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष - उपाध्यक्ष निवडीवेळी शिवसेनेचे दोन नगरसेवक तटस्थ राहील्याने राष्ट्रवादीचे युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांनी शिवसेनेचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्यावर नाव न घेता गंभीर आरोप केला आहे. शिवसेनेने भाजपसोबत जाण्याचा कट रचल्याचा आरोप त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे केला आहे.

या १७ नगरसेवकांच्या निवडणुकीसाठी महेबुब शेख यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादीला चार जागांवर समाधान मानावे लागले. तर, जिल्हाभरात हारीकिरी झालेल्या शिवसेनेचे केवळ शिरुर कासारमध्येच दोन नगरसेवक विजयी झाले. तर, भाजप आमदार सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी भाजपने ११ जागा जिंकल्या. नगराध्यक्ष - उपाध्यक्ष निवडीवेळी शिवसेनेने तटस्थ भूमिका निभावली. त्यामुळे श्री. शेख यांनी आरोप केले आहेत.

भाजपसोबत अधिकृत गटात शिवसेना नगरसेवक गेले आहेत. त्यांच्या या भाजपसोबत जाण्याने निवडणुकीच्या पूर्वीच असलेल्या छुप्या युतीचे कारस्थान जनतेच्या समोर आणि राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेना कार्यकर्त्यांच्या समोर उघड झाले. या स्वार्थी छुप्या युतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहा जागा पाडण्याचे काम केल्याचा आरोपही श्री. शेख यांनी केला.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कष्ट घेत आहेत. तर दुसरीकडे त्यांच्या पक्षातील स्वार्थी नेते आणि माजी मंत्री निवडणुकीच्या पूर्वीच भाजपच्या माजी मंत्र्यांसोबत छुपी युती करत होते, असेही त्यांनी या फेसबुक पोस्टमध्ये लिहले आहे.
'अंधारात साटेलोटे करून, उजेडात मोहतूर लावणाऱ्या बीडच्या नेत्याला पक्ष आघाडीची आठवण करुन देणार का, हा प्रश्न पडला आहे, असे शेख यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT