Santosh Deshmukh Walmik Karad Dhananjay Munde 1 Sarkarnama
मराठवाडा

Santosh Deshmukh murder Beed : संतोष देशमुखांच्या हत्येपूर्वी 4, 5, 6,7 अन् 8 तारखेला काय काय घडलं? 'खास' व्यक्तीबरोबर आरोपींच्या बैठका

Dhananjay Deshmukh investigation meetings Dhananjay Munde Walmik Karad Santosh Deshmukh murder Beed : बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्येपूर्वी धनंजय मुंडे, वाल्मिक कराड आणि आरोपींच्या भेटी आणि बैठकांच्या चौकशीची मागणी धनंजय देशमुख यांनी केली.

Pradeep Pendhare

Beed murder news : बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्येचा खटला न्यायालयात सुरू झाला आहे. खटल्याच्या पहिल्याच सुनावणीत सरकार पक्षाकडून विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी मोठा पुरावा सादर केला. हा खटला सुरू होताच, सीआयडी, एसआयटीने दाखल केलेल्या दोषारोपपत्रात दाखल केलेल्या जबाबातून वेगवेगळे अन् धक्कादायक असे खुलासे होत आहे.

आता संतोष देशमुख यांच्या हत्येपूर्वी आमदार धनंजय मुंडे यांच्यासमवेत वाल्मिक कराडसह प्रमुख आरोपींच्या गाठीभेटी आणि बैठका झाल्याचे सुदर्शन घुले याच्या जबाबातून समोर आलं आहे. यावरून धनंजय देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी करत या बैठकांमध्ये नेमकं काय झालं, हे समोर आलं पाहिजे, अशी मागणी केली.

बीडमधील (BEED) संतोष देशमुख यांची 9 डिसेंबरला हत्या झाली. या हत्येपूर्वी आरोपींमध्ये बऱ्याच काही संवेदनशील बैठका झाल्याचा घटनाक्रम आरोपी सुदर्शन घुले याच्या जबाबातून समोर आला आहे. यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

4 डिसेंबरला धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि विष्णू चाटे यांची भेट झाली होती. 5 डिसेंबरला विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड याची मुंबईत भेट होऊन बैठक झाली होती. 5 डिसेंबरला सातपुडा बंगल्यावर धनंजय मुंडे, वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सारंग आंधळे आदींच्या भेटी झाल्या होत्या. तसे सुदर्शन घुलेच्या जबाबानुसार 5 डिसेंबरला विष्णू चाटे याचे तीन फोन आले होते.

6 डिसेंबरला वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे मुंबईत भेटले होते. 7 डिसेंबरला विष्णू चाटे पुण्यात आला. त्यानंतर 8 डिसेंबरला विष्णू चाटे, सुदर्शन घुले आणि इतर आरोपी हॉटेल तिरंगामध्ये बसले आणि तिथेच सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे नियोजन झाले. त्यानंतर तेथून विष्णू चाटेने वाल्मिक कराड याला निरोप दिला. यानंतर 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली.

बंगल्यावरच्या बैठका रेकॉर्डवर आहेत

'मुख्यमंत्री साहेबांनी शब्द दिला आहे. यामध्ये जे कुणी जरी असला, हत्या करणाऱ्यांमध्ये, आरोपींची पाठराखण केलेली आहे, अभय दिलेला आहे, त्या प्रत्येकाला शिक्षा झाली पाहिजे. म्हणून चार, पाच, सहा आणि तेथून पुढे काही घडलं, त्यापूर्वी देखील बरचं घडलं आहे. खरी सुरवात 28 मे रोजी पासून आहे. त्याच्या अगोदर देखील यांच्या बंगल्यावर बैठका झाल्या आहेत. तसे रेकॉर्डवर देखील आलं आहे', असे धनंजय देशमुख यांनी म्हटले.

सर्व कोठून झालं, हे स्पष्ट...

चार, पाच तारखेला घटना घडल्या आहेत, कॉल झालेले, रेकॉर्डिंग आहे, मुंबईत भेटी झालेल्या आहेत. त्याचा तपास झाला पाहिजे. यातून ऑर्डर कोठून आलेली आहे. काय गायडन्स केलेले आहे, हे सर्व समोर आलं पाहिजे, अशी आमची मागणी आहे. चार, पाच तारखेला सर्वांचे झालेले फोन, रेकॉर्डिंग, व्हाॅट्सअ‍ॅपला मेसेज किंवा फेसबुक असलेल्या पोस्ट, यावरून स्पष्ट दिसते की, हे सर्व कोठून झालेले आहे, याची माहिती आणि तपास व्हावा, यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार असल्याचे धनंजय देशमुख यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT