Beed Shivsena Swapnil Galdhar  Sarkarnama
मराठवाडा

Beed News: शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाला पहाटे फोन करुन दमदाटी, शिंदेंविरोधातही आक्षेपार्ह भाषा; ऑडिओ क्लिप व्हायरल, पोलिसांनी उचललं मोठं पाऊल

Shivsena Politics: शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याबाबत अत्यंत हीन व आक्षेपार्ह भाषा वापरत शिवीगाळ केल्याप्रकरणी अंबाजोगाई तालुक्यातील भारज येथील ईश्वर शिंदे याच्याविरोधात अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Jagdish Pansare

Shivsena News: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी नारायण गडावरून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याविरोधात बोलू नये, अन्याथा तुमचे स्वागत बीडमध्ये कसे करायचे? हे ठरवू, असा इशारा देत बीडचे शिवसेना जिल्हाप्रमुख स्वप्नील गलधर यांनी मनोज जरांगे पाटील यांना विरोध दर्शवला होता.

यानंतर एकनाथ शिंदे, स्वप्नील गलधर यांच्यावर आक्षेपार्ह भाषा वापरत दमदाटी केल्याची वादग्रस्त ऑडिओ क्लीप सोशल मिडियावर व्हायरल झाली होती. दिवसभर यामुळे बीड जिल्ह्याचे राजकीय वातावरण तापले होते. अखेर या प्रकरणी आता ईश्वर शिंदे या तरुणाविरोधात अंबाजोगाईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ​हा तरूण मनोज जरांगे पाटील समर्थक असल्याचे बोलले जाते.

शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याबाबत अत्यंत हीन व आक्षेपार्ह भाषा वापरत शिवीगाळ केल्याप्रकरणी अंबाजोगाई तालुक्यातील भारज येथील ईश्वर शिंदे याच्याविरोधात अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. शिवसेनेचे बीड जिल्हाप्रमुख स्वप्नील गलधर यांना फोन करून दमदाटी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

​पोलिसांकडे दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीनुसार, १३ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे ४ वाजून २६ मिनिटांच्या सुमारास ईश्वर शिंदे याने शिवसेनेचे बीड जिल्हाप्रमुख स्वप्नील गलधर यांना फोन केला होता. मनोज जरांगे यांच्या भूमिकेवरून आणि पक्षाच्या भूमिकांवरून त्याने स्वप्नील गलधर यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. तुम्ही जरांगे पाटील यांच्या विरोधात का भूमिका घेतली? असा जाब त्याने विचारला.

यावर, मी पक्षाचा जिल्हाप्रमुख असल्याने मला पक्षाची भूमिका मांडावीच लागेल आणि जरांगे पाटील यांनी आमच्या पक्षप्रमुखांवर बोलू नये, अशी स्पष्ट भूमिका मांडली. ​यावर ईश्वर शिंदे याने थेट एकनाथ शिंदे यांच्याबद्दल अत्यंत अर्वाच्य, गलीच्छ आणि आक्षेपार्ह भाषेत शिवीगाळ केली. हे संपूर्ण फोनवरील संभाषण रेकॉर्ड करून सोशल मीडियावर व्हायरलही झाले.

या प्रकारामुळे संतप्त झालेल्या शिवसेनेचे अंबाजोगाई तालुकाप्रमुख अर्जुन गोविंदराव वाघमारे यांनी १६ ऑक्टोबर २०२६ रोजी पोलीस ठाण्यात गाठून फिर्याद दिली. या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५२ अंतर्गत अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात एनसीआर नोंदवण्यात आली असून, पुढील तपास पोलीस उपनिअरक्षक घुले यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT